Skip to content
बुधवार, जुलै 22, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

शिरुर तालुक्यात चाकूचा धाक दाखवत बँक खात्यातुन पैसे जबरदस्तीने केले ट्रान्सफर अन…

क्राईम मुख्य बातम्या
फेब्रुवारी 23, 2023फेब्रुवारी 23, 2023शिरूर तालुका टीम

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये दोन जणांवर गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवत, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या बँक खात्यातील पैसे जबरदस्तीने स्वतःच्या बँक खात्यात जबरदस्तीने घेतल्याने दोन जणांवर गुन्हा दाखल झाला असुन योगेश सुनिल बारवकर (वय 27 वर्ष) रा.शिरुर बायपास पाषाणमळा (ता. शिरुर) जि.पुणे आणि गौतम छगन शिंदे (वय 30 वर्ष) रा.पिंपरी कोलंदर ता.श्रीगोदा जि.अहमदनगर सध्या रा.यशईन चौक कारेगाव (ता. शिरुर) जि.पुणे अशी त्यांची नावे आहेत. याबाबत रवींद्र बाबन जेना (वय 44 वर्ष) रा.कारेगाव, यश-इन चौक मूळ रा. बारभाटिया, ता. कोमलदा जि. बालेश्वर, राज्य ओडिसा यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश इन चौक येथे योगेश बारवकर व गौतम शिंदे यांचे चायनीजचे हॉटेल असुन फिर्यादी रवींद्र बाबन जेना यांनी हॉटेल व्यवसायाकरिता काढलेल्या कर्जाचे 1 लाख रुपये रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले असताना त्यापैकी 89 हजार रुपये फिर्यादीचा मोबाईल काढुन घेत त्याला चाकूचा धाक दाखवत हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत आरोपी योगेश सुनील बारवकर याने जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. सदरबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला अथवा कुणाकडे तक्रार केली तर “उलटा टांग के काट के फेक दूंगा” असे म्हणून ओप्पो कंपनीचा मोबाईल घेऊन गेला.

त्यामुळे फिर्यादीने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेत वरील दोघांच्या विरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी दोन्ही आरोपिंना अटक करुन शिरुर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे करत आहेत.

Tagged accountbankCrimeForciblyknifeMoneyNewsshirurtalukathreattransferredunder

पोस्टचे नॅव्हिगेशन

शिक्रापूरच्या उपसरपंचावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात विजचोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल

संबंधित पोस्ट

शिरुर; आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश : म्होरक्यासह दोघांना अटक, ६ गुन्हे उघड

जुलै 12, 2025शिरूर तालुका टीम

शिक्रापुरात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तो व्यक्ती कोमात, डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा अन्यथा…

जानेवारी 20, 2023शिरूर तालुका टीम

सख्खा भाऊच झाला भावाचा वैरी, धारदार कोयत्याचा धाक भावाला दिली जीवे मारण्याची धमकी

जुलै 21, 2023जुलै 21, 2023शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ
  • भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…
  • शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…
  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ
  • विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

Popular Categories

  • आरोग्य (2,302)
  • इतर (154)
  • क्राईम (1,691)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (366)
  • मनोरंजन (168)
  • महाराष्ट्र (5,104)
  • मुख्य बातम्या (2,170)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (973)
  • शिरूर तालुका (2,843)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ
  • भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…
  • शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…
  • विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ
  • विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!