Shirur Police Station

शिरूर एसटी स्टॅण्डजवळून लांबवली महिलेची पर्स…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एसटी स्टॅण्डजवळ पतीची वाट पाहत उभ्या असलेल्या महीलेच्या हातातील मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पर्स लांबवून पर्समधील १६, ६५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, मंगळवारी (ता. १२) सायंकाळी साडेआठ वाजता संगिता घोलप व तिचे पती विश्वास घोलप असे मुलांना घेवून मोटर सायकल वरती शिरूर बाजार पेठेत मुलांचे कपडे घेण्यासाठी भंडारी कलेक्शन दुकानात गेले होते. कपडे खरेदी केल्यानंतर गाडीवर मुलांना कपडे घेवून गाडीवर बसण्यासाठी जागा कमी असल्याने विश्वास घोलप मुलांना सोडण्यासाठी राहाते घरी गेले. मुलांना सोडून पत्नी संगिता हिला घेण्यासाठी येणार असल्याने पत्नी चालत शिरूर एस टी स्टॅण्ड समोरील रोडच्या कडेला पती विश्वास घोलप यांची वाट पाहात थांबलेली होती. त्याच वेळेस व्यायाम शाळेच्या बाजूने दोन अनोळखी व्यक्ती मोटार सायकल वरती आले व त्यातील पाठीमागे बसलेल्याने संगिताच्या हातातील पर्स ओढून पाबळ फाटा बाजूकडे पळून गेले.

महिलेने चोर चोर असे ओरडले असता तेथे उभे असलेल्या लोकांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु, ते त्यांचे मोटार सायकलवरती सुसाट निघुन गेले. त्यातील मोटार सायकल चालवीत असलेला व त्याचे पाठीमागे बसलेल्यांचे वय अंदाजे २२ ते ३० वयोगटातील आहे. पाठीमागे बसलेल्याचे केस कुरूळे असल्याचे नागरीक सांगत आहे. पर्समधील १०,००० रुपयांची एक फुलाची डिझाईन असलेली २ ग्रॅम ९० मिली वजनाची सोन्याची अंगठी व ६५०० हजार रुपये रोख रक्कम ५०० रुपयांच्या १३ नोटा अशा प्रकारे एकूण १६,५५० रुपयांचा माल चोरून नेला आहे.

दरम्यान, याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून, शिरूर पोलिस पुढील तपास करत आहे. शिरूर तालुक्यात चोरट्यांनी तीन महिन्यांपासून धुडगुस घालत असून, शिरूर पोलिसांची झोप उडवली आहे. चोरट्यांनी तपास यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.