पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका, रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आणि बेस्ट […]

अधिक वाचा..

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक हरून आतार यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यालय परिसर आकर्षक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करुन त्यांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवार (दि 15) रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शिरुर पोलिसांनी आरोपी नातवाला अवघ्या काही तासांत ताब्यात […]

अधिक वाचा..

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, भत्ते आणि प्रशिक्षण योजनांमध्ये त्यांच्याच मुलांना डावलायचे, ही कोणती सामाजिक न्यायाची भूमिका आहे? राज्यातील सर्वात मोठा समाजघटक असलेल्या ओबीसी समाजाला योजनांच्या लाभात कायम दुय्यम स्थान का दिले जाते? जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक निधी […]

अधिक वाचा..

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी’ (Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia) या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील […]

अधिक वाचा..

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक […]

अधिक वाचा..

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला तीन दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून ताब्यात घेण्यात आले. 8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 78 लाख […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे दूषित होतं. त्यामुळे पावसाळ्यात डायरिया (diarrhoea) किंवा कॉलरा (cholera) होण्याचा धोका वाडतो. अशात वेळीच काही गोष्टींची काळजी घेतली तर डॉक्टरांकडे जाण्याची आणि पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही. डायरिया आणि कॉलरासारख्या आजाराच्या मुख्य कारणात अस्वच्छता असतं. त्यामुळे या दिवसात स्वच्छतेवर […]

अधिक वाचा..

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या आहारामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. पोटाचे आरोग्य बिघडून अपचनाचा त्रासही होतो. पावसाळ्यात आपल्याला उघड्यावरचे अन्न खाण्यास मनाई केली जाते. या ऋतूमध्ये माश्या आणि डासांची संख्या अधिक प्रमाणात वाढते. […]

अधिक वाचा..

गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल 

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये, तसेच सतत उभं राहणाऱ्या किंवा शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. दीर्घकाळ उभं राहणं, वजन वाढ, वाढतं वय, संधिवात किंवा स्नायूंवरील ताण यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना जाणवते. या वेदनांवर कायमस्वरूपी उपाय शोधणं अनेकांसाठी आवश्यक असते. गुडघेदुखीवर आपण […]

अधिक वाचा..