अमेरिकेत थरारक प्रसंग! इंजिन निकामी; पायलटचे ‘शेवटचे शब्द’ रेकॉर्ड

रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करून दोघांचे प्राण वाचले अमेरिका: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील गेन्सविले येथे एका छोट्या विमानाचा अपघात थोडक्यात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच विमानाचे इंजिन बंद पडल्याने पायलटने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमान थेट वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर उतरवण्यात आले आणि सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षित बचावले. सोमवारी (९ फेब्रुवारी) […]

अधिक वाचा..

गुजरातीबहुल मतदारसंघातील मराठी चेहरा; रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने तावडे यांची निवड निश्चित झाली. तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेच्या ताब्यातील महापौरपद भाजपकडे गेले आहे. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रितू तावडे या गुजरातीबहुल मतदारसंघातून […]

अधिक वाचा..

स्वायत्ततेकडून गुणवत्तेकडे! उच्च शिक्षणाची नवी झेप पिल्लई विद्यापीठाच्या उद्घाटनाने ज्ञानयुगाची नवी सुरुवात

नवी मुंबई: नवी मुंबईत स्थापन झालेले पिल्लई विद्यापीठ हे राज्यातील पहिले खाजगी विद्यापीठ असून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे व ऐतिहासिक पाऊल आहे. स्वायत्ततेचा अर्थ केवळ अधिकार नसून ती गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याची मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नवी मुंबई, पनवेल येथे राज्यातील […]

अधिक वाचा..

अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे याची मुख्य कारणे कोणती 

मुख्य कारणे 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशर: रक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे: दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे […]

अधिक वाचा..

हसण्याचे शारीरिक व मानसिक फायदे…

हसणं म्हणजे फक्त चेहऱ्यावर हास्य नाही, ते म्हणजे मन, मेंदू आणि शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे. हसण्याचे फायदे, वैज्ञानिक आधारासह आणि रोजच्या जीवनात त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो, याची सविस्तर माहिती आहे. हसण्याचे शारीरिक व मानसिक फायदे तणावमुक्ती:हसताना मेंदूमध्ये एंडॉर्फिन्स आणि डोपामिन नावाचे आनंददायक हार्मोन्स स्रवतात, जे तणाव कमी करतात. रक्तदाब नियंत्रणात राहतो: नियमित हसण्यामुळे […]

अधिक वाचा..

खायच्या पानाचे पाणी पिल्याचे फायदे

खायचं पान हे आयुर्वेदात उष्ण गुणधर्म असलेले मानले जाते. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि कफ विरघळवणारे गुण असतात. पान उकळून त्याचे पाणी पिल्यास छातीत साचलेला कफ विरघळतो आणि श्वास मार्ग मोकळा होतो. खायच्या पानांचे पाणी पिल्याचे फायदे 1) छातीतला कफ कमी होतो खायचं पान उष्ण असल्यामुळे छातीत साचलेला चिकट कफ विरघळून बाहेर पडतो. 2) खोकल्यावर त्वरित […]

अधिक वाचा..

मैथिली ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; सरकारी रुग्णालय की मृत्यूचा सापळा…

बिहार: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या प्रसिद्ध लोकगायिका आणि नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. “कागदावर सर्व काही सुरळीत दाखवले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी उत्तराचा […]

अधिक वाचा..

मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा; राज ठाकरेंवर कोश्यारींचा पलटवार

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषिक मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधत “राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत” असा खळबळजनक दावा केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. वरळी डोम […]

अधिक वाचा..

पुण्यात भाजपची धडक कारवाई; ६९ बंडखोर कार्यकर्त्यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पुण्यात भारतीय जनता पक्षाकडून मोठी संघटनात्मक कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या तब्बल ६९ कार्यकर्त्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून संबंधित सर्वांचे प्राथमिक सदस्यत्व पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. बंडखोरी भोवली पुणे महानगरपालिका […]

अधिक वाचा..

बीडमध्ये बारावी परीक्षेचा मोठा घोटाळा? पेपरवर कॉलेज, परीक्षा दुसरीकडे; ‘बीड पॅटर्न’ची चर्चा

बीड: बीड जिल्ह्यात बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटावर एक परीक्षा केंद्र तर प्रत्यक्ष परीक्षा मात्र दुसऱ्याच ठिकाणी घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परळी तालुक्यात एकूण ११ परीक्षा केंद्रांवर सुमारे ५ हजार विद्यार्थी बारावीची […]

अधिक वाचा..