आजचे राशीभविष्य! कुणाला धनलाभ, कुणाला सावधगिरीचा इशारा; तुमची रास काय सांगते?

मेष: नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील वाद मिटतील. घरातील लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आनंदी वातावरण राहील. सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढेल. काही प्रमुख नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राच्या भेटीने मन प्रसन्न होईल. वृषभ: धैर्य व आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील अडचणी दूर होतील. आरोग्य सुधारण्याचे संकेत आहेत. मात्र काही गोष्टींची चिंता […]

अधिक वाचा..

झोप कमी झाली तर मेंदूवर गंभीर परिणाम! अनेक आजारांची हीच असते सुरुवात

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोपेकडे दुर्लक्ष होणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र झोप ही केवळ विश्रांती नसून शरीर व मेंदूचे नैसर्गिक रीसेट बटन आहे. झोप पूर्ण न झाल्यास त्याचा थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. झोपेच्या काळात शरीर दिवसभरातील थकवा, ताणतणाव आणि मानसिक ओझ्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करते. मात्र झोप अपुरी राहिली किंवा वारंवार […]

अधिक वाचा..

नाव, जन्मतारीख किंवा धर्म बदलायचा आहे? आता घरबसल्या मिळवा अधिकृत गॅझेट

मुंबई: दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र, जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर अधिकृत कागदपत्रांमध्ये नाव किंवा जन्मतारीख जुळत नसेल, किंवा लग्नानंतर नाव बदलायचे असेल, तर आता सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या Aaple Sarkar पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून काही दिवसांतच अधिकृत राजपत्र (Gazette) मिळवता येते. ही सेवा कोणासाठी उपयुक्त आहे? दहावी सर्टिफिकेट आणि […]

अधिक वाचा..

पप्पा, मी बुडतोय! वडिलांच्या डोळ्यादेखत सिस्टिमने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव

गुरुग्राममध्ये उघड्या बेसमेंटमध्ये कार कोसळली; दोन तास मृत्यूशी झुंज, मदत उशिरा गुरुग्राम: शुक्रवारी रात्री दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घरी निघालेल्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियरचा गुरुग्राममध्ये अत्यंत दुर्दैवी अंत झाला. दाट धुकं, बोचरी थंडी आणि रस्त्यावर कोणतेही साईन बोर्ड वा रिफ्लेक्टर नसल्यामुळे त्याची कार थेट मृत्यूच्या सापळ्यात कोसळली. 27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी […]

अधिक वाचा..

दिव्यांग भिकाऱ्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; इंदूरमधील भिकाऱ्याचा थरारक पर्दाफाश

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून भिक्षावृत्तीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सराफा बाजार परिसरात भीक मागणाऱ्या एका दिव्यांग भिकाऱ्याकडे चक्क तीन पक्की घरं, तीन रिक्षा आणि एक कार असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. मांगीलाल असं या भिकाऱ्याचं नाव असून, महिला व बालविकास विभागाच्या बचाव पथकाच्या कारवाईत ही माहिती उघडकीस आली. सराफा बाजार […]

अधिक वाचा..

पीएम किसान योजना! 22 व्या हप्त्यापुर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष 22ऱ्या हप्त्याकडे लागले असून, हा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! कर्तव्यावर असताना एसटी प्रवास मोफत

राज्य शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी मुंबई: राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना एसटी बसने प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी प्रशासकीय पातळीवर झालेल्या बैठकीनंतर याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश काय […]

अधिक वाचा..

आमची मुंबई, मराठी मुंबई; लोक चळवळीची गरज

नेते हो, मतभेद असतील तर ते संपवा; मुंबईच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या! “आमची मुंबई, मराठी मुंबई” हा केवळ नारा न राहता तो लोकचळवळ बनला पाहिजे, अशी अपेक्षा आज मुंबईतील मूळ मुंबईकर व्यक्त करत आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मुंबईची ओळख, मराठी माणसाचा हक्क आणि शहराचे भविष्य या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. […]

अधिक वाचा..

दहावी परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून उपलब्ध

मुंबई: फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे मंगळवार, 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभागीय मंडळांतील माध्यमिक शाळांनी ही हॉल तिकीटे अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करायची […]

अधिक वाचा..

भावना नव्हे तर विकास जिंकला; मुंबईतील नगरसेवकांना शिंदेंचा संदेश

सत्ता म्हणजे विकास, त्यात भेदभाव नको;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांना स्पष्ट संदेश मुंबई: वॉर्डच्या विकासासाठी सत्तेचा योग्य वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा, असे ठाम निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले. मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड […]

अधिक वाचा..