मुंबई: फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे मंगळवार, 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व विभागीय मंडळांतील माध्यमिक शाळांनी ही हॉल तिकीटे अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करायची आहे.
हॉल तिकीट कुठे मिळणार
अधिकृत संकेतस्थळ : www.mahahsscboard.in
हॉल तिकीट फक्त शाळांमार्फतच डाऊनलोड करता येणार
विद्यार्थ्यांना शाळेकडूनच प्रिंट दिली जाणार
शाळांची जबाबदारी काय
सर्व विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे शाळांनी डाऊनलोड करून प्रिंट काढणे बंधनकारक
हॉल तिकीटावर मुख्याध्यापकांचा शिक्का व स्वाक्षरी असणे आवश्यक
तांत्रिक अडचणी असल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन
हॉल तिकीटासाठी शुल्क लागणार का
विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये
हॉल तिकीट पूर्णपणे मोफत असून शाळांकडूनही कोणतीही फी आकारली जाणार नाही
कोणाला मिळणार हॉल तिकीट
ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांनाच हॉल तिकीट मिळणार
शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरल्यानंतरच हॉल तिकीट उपलब्ध होणार
दहावी परीक्षा 2026 – महत्त्वाच्या तारखा
लेखी परीक्षा : 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026
प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा : 2 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026
विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट मिळाल्यानंतर त्यावरील नाव, विषय, केंद्र याची तपासणी करून कोणतीही चूक असल्यास तात्काळ शाळेशी संपर्क साधावा, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.