नाव, जन्मतारीख किंवा धर्म बदलायचा आहे? आता घरबसल्या मिळवा अधिकृत गॅझेट

महाराष्ट्र

मुंबई: दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र, जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर अधिकृत कागदपत्रांमध्ये नाव किंवा जन्मतारीख जुळत नसेल, किंवा लग्नानंतर नाव बदलायचे असेल, तर आता सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही.

महाराष्ट्र शासनाच्या Aaple Sarkar पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून काही दिवसांतच अधिकृत राजपत्र (Gazette) मिळवता येते.

ही सेवा कोणासाठी उपयुक्त आहे?

दहावी सर्टिफिकेट आणि जन्मदाखल्यात तफावत असल्यास

आधार, पॅन, बँक कागदपत्रांत नाव वेगळे असल्यास

लग्नानंतर नाव किंवा आडनाव बदलायचे असल्यास

नावातील स्पेलिंग चूक दुरुस्त करायची असल्यास

जन्मतारीख दुरुस्त करायची असल्यास

धर्म बदलाची अधिकृत नोंद करायची असल्यास

प्रक्रिया कालावधी

साधारण 10 ते 15 दिवस

गॅझेट प्रकाशित झाल्यानंतर PDF डाउनलोड करून प्रिंट काढता येते

शासन निर्धारित शुल्क

खुला वर्ग : ₹523.60

आरक्षित वर्ग (ई.मा.व. वगळून) : ₹273.60

अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Certificate_Documents?ServiceId=223

आवश्यक कागदपत्रे

ओळख पुरावा – आधार / पॅन / पासपोर्ट / मतदान कार्ड

पत्ता पुरावा – आधार / रेशन कार्ड / वीज बिल

जन्मदाखला (DOB बदलासाठी)

विवाह प्रमाणपत्र (लग्नानंतर नाव बदलासाठी)

शपथपत्र (नाव / मधले नाव बदलासाठी)

पासपोर्ट साईज फोटो

अर्ज करण्याची थोडक्यात प्रक्रिया

वेबसाईटवर Login किंवा Register करा

“Change of Name / Date of Birth / Religion – Gazette” सेवा निवडा

अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

ऑनलाईन पेमेंट करा

अर्ज मंजूर झाल्यानंतर Gazette PDF डाउनलोड करा

महत्वाची सूचना

गॅझेट मिळाल्यानंतर आधार, पॅन, पासपोर्ट, बँक, शाळा–कॉलेज कागदपत्रांमध्ये बदल करता येतो

अर्जातील माहिती अचूक आणि खरी असणे आवश्यक

चुकीची माहिती दिल्यास अर्ज Reject होऊ शकतो