‘डीजे’ बंदीला सादलगावात हरताळ; पोलिस निरीक्षकांनी स्वतः ध्वनिक्षेपक बंद केला

दोन गणेश मंडळांच्या कर्णकर्कश मिरवणुकीवर नागरिकांची तक्रार; पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची तातडीने कारवाई शिरूर (तेजस फडके): सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेवर निर्बंध असतानाही सादलगावात दोन सार्वजनिक गणेश मंडळांकडून डीजेचा मोठा आवाज लावून मिरवणूक काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला. कर्णकर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या जागरूक नागरिकांनी थेट शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

कवठे येमाईत ६० किलो गांजा जप्त; स्कॉर्पिओसह एकाला अटक

स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई; ५२ वर्षीय संशयित ताब्यात शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथे अमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि शिरूर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी […]

अधिक वाचा..

नवीन महाविद्यालयांसाठी पंचवार्षिक आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंची छाननी होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षणाच्या सुविधा अधिक समन्यायी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आणि गरजेनुसार नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठांच्या पंचवार्षिक आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंचा समावेश करण्यासाठी उपसमिती गठीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च […]

अधिक वाचा..

मोबाईल आत गेला कसा?; साहिल वाकोडे प्रकरणात आता आयआयटीच्या परीक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर परीक्षा, कथित मोबाईल वापर, प्राध्यापकांवरील आरोप, जातीय छळाची तक्रार, संस्थात्मक जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या १८ मागण्यांवरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, विद्यार्थ्यांचे जबाब आणि अन्य पुरावे तपासले जात आहेत. या सगळ्या चर्चेत मात्र एक मूलभूत प्रश्न कायम राहतो—परीक्षा कक्षात […]

अधिक वाचा..

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. एसआयआरच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे यादीबाहेर गेल्याचा दावा करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, निवडणूक आयोगाच्या उपलब्ध माहितीनुसार एसआयआरचा उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करून पात्र मतदारांची नावे कायम ठेवणे […]

अधिक वाचा..

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतातील पिके जळून गेली आहेत. काही ठिकाणी उरलेली पिकेही वाया गेल्याने शेतकऱ्यांना त्यावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. मात्र, सरकारकडून प्रत्यक्ष मदतीऐवजी केवळ कागदी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे, अशी […]

अधिक वाचा..

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार बेकायदा वाळू उपसा चालु असताना घोड पाटबंधारे विभागाने पोलिसांकडे केवळ ठराविक व्यक्तींची नावे दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता थेट घोड पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेकायदा वाळु उपसा करणारांची यादी मोठी असताना केवळ ठराविक व्यक्तींच्या नावाचे […]

अधिक वाचा..

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात चप्पल घेऊन मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या 47 वर्षीय रमाबाई रणवीर यांच्या जिद्दीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अंबाजोगाई येथील मॅरेथॉनमध्ये त्यांनी दाखवलेल्या या असामान्य धैर्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, देशभरातून त्यांच्या संघर्षाला सलाम केला जात आहे. रमाबाईंच्या या […]

अधिक वाचा..

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकार मात्र बैठका आणि चर्चांमध्ये वेळ घालवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना शिक्रापूर हद्दीतील चाकण चौकाजवळ तळेगाव रोडवर घडली आहे. याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट आणि स्टंपने मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील चाकण चौकाजवळ तळेगाव रोडवर […]

अधिक वाचा..