Narayan-Pawar

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिक नारायण पवार यांचे निधन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील नारायण रामचंद्र पवार (वय ६२) यांचे रविवारी (ता. ९) अल्पशा आजाराने निधन झाले. गावामध्ये रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नारायण पवार यांनी लष्करी सेवेनंतर शेतीसोबतच उद्योग व्यवसायात प्रगती केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पन केले होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी मैत्रीचे नाते होते. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

नारायण पवार यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक भाऊ, चार बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. दादाभाऊ पवार यांचे ते धाकटे बंधू तर प्रा. योगेश पवार व प्रगतशील शेतकरी आकाश पवार हे त्यांचे पुत्र होत. युवा उद्योजक गणेश पवार हे त्यांचे पुतणे तर पत्रकार संतोष धायबर हे त्यांचे भाचे होत. दरम्यान, निमगाव म्हाळुंगी येथील कामिनी नदीच्या किनारी १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता दशक्रिया विधी होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांचे मोठं मन; ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन…

पहेलगाम हल्ला! निमगाव म्हाळुंगीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च, रॅली…

निमगाव म्हाळुंगी येथील माजी उपसरपंच रंजना काळे यांचे निधन

निमगाव म्हाळुंगी येथे दशक्रिया शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत