राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनावणीनंतर विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत युक्तिवादाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा श्रेष्ठ असल्याचा मुद्दा […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये गेल्या अवघ्या सात महिन्यांत तीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत घडलेल्या या तीन घटनांनंतरही अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नेमक्या कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना […]

अधिक वाचा..

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

दक्षिण रत्नागिरीतील भाजप संघटनेचे शिल्पकार हरपले; गुरुवारी मूळ गावी अंत्यसंस्कार मुंबई: राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीकडे परत येत असताना पाली परिसरात त्यांना अचानक अस्वस्थता […]

अधिक वाचा..

राज्यात ३०,२०९ शिक्षक पदांची भरती सुरू; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत

पवित्र पोर्टलवरून गुणवत्ताधारित प्रक्रिया; १.७० लाख उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकांच्या ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला पवित्र (Pavitra) पोर्टलवरून सुरुवात झाली आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. टीएआयटी-२०२५ परीक्षेसाठी […]

अधिक वाचा..

मुंबईत प्राइम फोकसचा अत्याधुनिक स्टुडिओ सुरू; सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठी चालना; देवेंद्र फडणवीस

मुंबई: गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘वेव्ह्स 2025’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने ७२ वर्षीय शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण 

न्हावरे (अक्षय टेमगिरे) मांडवगण फराटा (ता. शिरुर) दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन ७२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला हाताने तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सागर विश्वास गव्हाणे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

नियमांनुसार काम करायचे नसेल तर राजीनामा द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा

प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मुंढे यांची भूमिका; “एफडीएची लॅब ही २४ तास कार्यरत आणीबाणीची सेवा” मुंबई : राज्यभरात अन्नभेसळ आणि नियमबाह्य कारभाराविरोधात धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “शासनाच्या नियमानुसार काम करायचे नसेल, तर राजीनामा देऊन निघून जावे,” असे ठाम विधान त्यांनी […]

अधिक वाचा..

दिल्लीत सचिन अहिर यांची केंद्रीय मंत्र्यांशी बैठक; मुंबईच्या पुनर्विकास, रेल्वे आणि मिठागरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

मुंबई: मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनी, रेल्वेच्या जागा, मिठागरांचा विकास आणि विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या या दौऱ्यात विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती अहिर […]

अधिक वाचा..

शेणातून होणार लाखोंची कमाई! सरकार खरेदी करणार बायोगॅस; ‘गोवर्धन’ योजनेला 23,731 कोटींची मंजुरी

नवी दिल्ली: शेण आणि इतर जैविक कचऱ्यापासून आता शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना मोठे उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 23,731 कोटी रुपयांच्या ‘गोवर्धन’ (GOBARdhan) राष्ट्रीय योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तयार होणारा कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) सरकार निश्चित दराने खरेदी करणार असल्याने उत्पादकांना बाजारपेठेची चिंता […]

अधिक वाचा..

शरद पवारांचा मोठा संघटनात्मक निर्णय; राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द

15-16 ऑगस्टला जिल्हाध्यक्षांची बैठक; लवकरच नव्या प्रवक्त्यांसह संघटनात्मक फेरबदलांची घोषणा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदल सुरू असून, पक्षाचे सर्व प्रवक्ते पदावरून हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच नव्या प्रवक्त्यांची घोषणा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शशिकांत शिंदे […]

अधिक वाचा..