रांजणगाव MIDC पोलिसांनी दुचाकी चोराला धाराशिवमधून केली अटक 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील महागणपती पार्किंगमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावत रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिसांनी आरोपीला धाराशिव जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडुन ३० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने कामगार वास्तव्यास आहेत. त्यामुळे परिसरात दाट लोकवस्ती असून दुचाकी वाहनांचीही […]

अधिक वाचा..

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागातर्फे चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनमध्ये आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या विचारमंथन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी मुंबई: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, परीक्षांतील कथित अनियमितता आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी मुंबईत गांधी भवन ते भाजप कार्यालय असा मोर्चा काढला. मात्र, रिगल सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात […]

अधिक वाचा..

झुरळ विचारांची पुरळ नव्हे, विकासाचा मार्ग निवडूया

मुंबई: भारतभूमी ही केवळ भौगोलिक सीमा नसून हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान, परंपरा, संघर्ष आणि सामर्थ्याची ओळख आहे. या भूमीने अनेक संकटांवर मात करत प्रत्येक काळात नव्या आत्मविश्वासाने जगासमोर आपले स्थान निर्माण केले आहे. आज भारत एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा वेळी देशाला सर्वाधिक गरज आहे ती विकासाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या सकारात्मक विचारांची. आज माहितीच्या […]

अधिक वाचा..

जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागतोय’ या भावनेने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू

मुंबई: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच आमदार […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, ड्रग पेरण्याची धमकी; सरकारवर विजय वडेट्टीवारांचा घणाघात

पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शेतकरी कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरले; लोकशाही दडपण्याचा आरोप नागपूर: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असून त्यांना ड्रग पेरण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पॅटर्नचे स्वागत; कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांना भरली धडकी

शिरुर (तेजस फडके): गेल्या काही महिन्यांपासून शिरुर तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबार, जीवघेणे हल्ले, टोळीयुद्ध, अवैध धंदे आणि सराईत गुन्हेगारांच्या वाढत्या हालचालींमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी आता केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हेगारांवर आधीच वचक निर्माण करण्यासाठी राबविलेल्या नव्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पॅटर्नचे […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर तालुक्यात हॉटेलसमोर तरुणाला काठ्यांनी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : करडे (ता. शिरुर) गावात जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाचा रस्ता अडवून शिवीगाळ करत चौघांनी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश ऊर्फ बाबू फुलफगर (वय २७ रा.निमोणे, ता.शिरुर) आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   View this post on […]

अधिक वाचा..

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी शेतात गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट फोडत तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता […]

अधिक वाचा..
cash

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली लाखो रुपयांची रक्कम शिरूर मधील एका बँक खात्यात जमा होत असल्याचे धक्कादायक वास्तव शिरूर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. देशाच्या विविध भागातील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये भरघोस नफा, आकर्षक नोकरीची ऑफर, गुंतवणुकीवर मोठा परतावा किंवा पोलिसांच्या नावाने भीती दाखवून आर्थिक फसवणूक […]

अधिक वाचा..