शिरुर पोलिसांचा आलेगाव पागा येथे अवैध गावठी दारु अड्डयावर छापा; एकावर गुन्हा दाखल 

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारुविक्री केल्याप्रकरणी शिरुर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत गावठी हातभट्टीची तयार दारु जप्त करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पांडुरंग रघुनाथ कोकरे (रा. आलेगाव पागा, ता. शिरुर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलिसांनी आठवडा बाजारात चोरट्यांचा डाव उधळला; दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

शिक्रापुर (ओमकार भोरडे) कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित सराईत चोरट्यांना शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचा डाव उधळून लावला. बाजार परिसरात नियमित सुरु असलेल्या पायी पेट्रोलिंगमुळे ही कारवाई शक्य झाली. या प्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमाच्या अन्वये शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात खाकीतील माणुसकीचा झरा! पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी तीन वर्षीय चिमुकलीला दिले जीवदान

शिक्रापुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि संवेदनशीलतेमुळे तीन वर्षीय चिमुकलीचे संभाव्य मोठे संकट टळले. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे शिक्रापूरसह शिरूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शिक्रापूरमधील चाकण चौक परिसरात घडली. एक व्यक्ती तीन वर्षांच्या बालिकेसह अत्यंत मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या […]

अधिक वाचा..

घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा, उजव्या आणि डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या उजव्या कालव्यातुन 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली. चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ७६३८ दशलक्ष घनफुट असुन उपयुक्त […]

अधिक वाचा..
crime

भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; जेवणाच्या वादातून चाकू हल्ला

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून तिघा हल्लेखोरांनी हॉटेल मालक आकाश शेखर दुबय्या यांच्यावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आकाश दुबय्या यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कुणाल दुबय्या किरकोळ जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

भाजप घरवापसीत रस नाही; शरद पवारांसोबतच राहणार; एकनाथ खडसे यांची स्पष्ट भूमिका

अमित शहांनी प्रवेशासाठी बोलावल्याचा दावा; राज्य भाजप नेतृत्वाने विरोध केल्याचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांवरही घणाघात मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला वैयक्तिकरित्या भाजपमध्ये परत जाण्यात कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि […]

अधिक वाचा..

साठे चौक रक्तरंजित! चाकूच्या सपासप वारांनी २१ वर्षीय तरुणाचा जीव घेतला

अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. मृत तरुणाचे नाव […]

अधिक वाचा..

स्वतः साठी रोज एवढ तरी करा

१) रिकाम्या पोटी हातपाय प्रेस करा, गरम करा. २) भरपूर टाळ्या वाजवा. ३) हातापायाचे तळवे जेथे दुखत असतील तेथे पंपिंग करून दाब द्या. ४) पायाखाली लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवा. (अँक्युप्रेशर करा) ५) आठवड्यातून एकदा तरी तेलाने सर्व शरीराला माँलिश करा. ६) नियमित प्राणायाम करा. ( भस्त्रिका, कपालभाती व अनुलोम विलोम ) ७) सकाळी एक […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी

हेल्दी डाएट ठेवा हायपरटेंशन पासून वाचण्यासाठी आपण डाएटची काळजी घ्यावी. अरबट चरबट खाऊ नये. चुकीच्या खाण्याच्या सवयीने देखील हा आजार होतो. वजन नियंत्रित ठेवणे जर वजन जास्त असेल, तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. जास्त वजन झाल्यास ब्लड प्रेशर वाढते. कमी मीठाचा वापर करा कमीत कमी मिठाचा आहारात वापर करावा. कमी मीठ खाल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित […]

अधिक वाचा..

सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही; कायदा-सुव्यवस्थेवर सतेज पाटील यांचा सरकारवर घणाघात

विधानपरिषदेत गुन्हेगारी, महिला सुरक्षा, पोलीस दलातील रिक्त पदे, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारला जाब मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही,” […]

अधिक वाचा..