shirur-crime

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि यापुर्वी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग… या दोन कारणांवरुन शिंदेवाडी येथे दोन गटांमध्ये वाद उफाळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचे गंभीर आरोप करत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. दि २७ ऑक्टोबर […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी शिरुर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील सराफ कट्टा आणि मुख्य बाजारपेठेत सोमवार (ता. २६) रोजी सकाळी ७:३० वाजता पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पायी पेट्रोलिंग करत परिसराची पाहणी केली. सणासुदीच्या काळात वाढणारी गर्दी आणि आर्थिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर चोरी, घरफोडी, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन मुलीला हिसकावून घेण्याची आणि पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी दिल्याचा, तसेच चारचाकी वाहनाच्या कर्जफेडीसाठी माहेरुन १० लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप विवाहितेने […]

अधिक वाचा..
nimone-aamble-crime

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची दारुची भट्टी उध्वस्त करत प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पहिल्या कारवाईत निमोणे येथे घोडनदीच्या किनारी उसाच्या शेतात सुरु असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी कच्चे रसायन, तयार दारु, केमिकलयुक्त ताडी आणि टोयोटा ग्लान्झा कार असा एकूण ५ लाख ४१ हजार ६०० […]

अधिक वाचा..

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा शिरूर (अक्षय टेमगिरे): एक लाख रुपयांची गुंतवणूक करा आणि दरमहा आठ ते दहा टक्के परतावा मिळवा, अशा आकर्षक आमिषाला बळी पडलेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. बहुचर्चित सिस-पे (CIS Pay) प्रकरणात शिरूर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण ९ हजार २८० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. करडे येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध, तर मांडवगण फराटा येथे विनापरवाना मद्य विक्री केल्याप्रकरणी एका पुरुषाविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये फिर्यादींना मारहाण करुन दुखापत केल्याच्या तक्रारी शिरुर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. एका घटनेत फिर्यादीच्या पत्नीला धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जागेच्या वादातून मारहाण; सहा जणांवर आरोप  पहिल्या घटनेत टाकळी हाजी येथील साबळेवाडी, बापुसाहेब नगर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निर्वी आणि कवठे येमाई येथील दोन व्यक्तींविरुद्ध हि कारवाई करण्यात आली असून, एका प्रकरणात महावितरण कंपनीचे तब्बल १३ लाख ६७ हजार ९७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या […]

अधिक वाचा..
sand-mafia-shirur

Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या नावाखाली शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील धरणालगतच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार महावितरणकडून हि कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेल्या ऊसाची डोळ्यादेखत राख रांगोळी होत आहे. शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे शॉर्टसर्किट मुळे सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला होता. त्यानंतर आता निमोणे येथे शॉर्टसर्किट होऊन पुन्हा ऊस जळून खाक झाला आहे. बुधवार, दि २१ ऑक्टोबर […]

अधिक वाचा..