उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरमधील मोटारींसह केबलची चोरी; १७ हजारांचा मुद्देमाल लंपास

न्हावरे (अक्षय टेमगिरे): उरळगाव (ता. शिरुर) येथील गट क्रं १६५ मधील दोन बोअरवेलमधून अज्ञात चोरट्याने दोन पाण्याच्या मोटारी आणि तांब्याची केबल असा सुमारे १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामदास लहानू काळे (वय ७१,रा. उरळगाव, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

‘रांजणगावमधील तुझे दिवस संपले’ MIDC मध्ये HR मॅनेजरला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या एका कंपनीच्या एचआर मॅनेजरला अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सॲप संदेशाद्वारे जीवे मारण्याची तसेच त्यांच्या मुलांच्या जीवाला धोका असल्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिस ठाण्यात NCR (प्राथमिक नोंद) करण्यात आल्याची माहिती आहे.   […]

अधिक वाचा..

अहिल्यानगरमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुणे LCB जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. पुणे LCB ने अटक केलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मण संजय शिरसाट (वय ३२), देविदास संजय शिरसाट (वय २४), आदित्य भाऊसाहेब कणगरे (वय २१) आणि आकाश श्रावण चक्रनारायण (वय २०) यांच्यासह […]

अधिक वाचा..

शिरुर बायपासवर बेकायदेशीर रस्ता दुभाजक तोडल्याने चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा बळी…

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार वाहनांच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शिरुर बायपासवरील रस्ता दुभाजकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संग्राम हॉटेलसमोर रस्ता दुभाजक बेकायदेशीरपणे तोडून तयार करण्यात आलेल्या मार्गामुळेच वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संतप्त नागरिक व वाहनचालकांकडून […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जांबुत शाखेची बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी

शिरूर (सुनिल जिते): ग्राहकांचा बँकेवरील विश्वास आणि सुरक्षित गुंतवणुकीला मिळणारा प्रतिसाद यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जांबुत शाखेने बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी केली आहे. नुकतेच शाखेच्या वतीने विशाल जुन्नर पतपेढीला दोन कोटी रुपयांचे बॉण्ड्स वितरित करण्यात आले. जांबुत शाखेने आतापर्यंत विविध संस्था व खातेदारांना एकूण ७ कोटी ९३ लाख १० हजार रुपयांचे बॉण्ड्स वितरित […]

अधिक वाचा..
Narayan-Pawar

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिक नारायण पवार यांचे निधन

शिरूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील नारायण रामचंद्र पवार (वय ६२) यांचे रविवारी (ता. ९) अल्पशा आजाराने निधन झाले. गावामध्ये रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नारायण पवार यांनी लष्करी सेवेनंतर शेतीसोबतच उद्योग व्यवसायात प्रगती केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पन केले होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी […]

अधिक वाचा..
pooja-gai-shirur

Video: शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

शिरूर: शिरूर शहरातील बाबुरानगर येथील एका खासगी रुग्णालयात हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया सुरू असताना एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पूजा राहुल गई (वय २८) असे मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील बाबुरानगर परिसरात असलेल्या ‘कोळपे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; सराईत दुचाकी चोर; पोलिसांच्या जाळ्यात

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरासह परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला असुन पेट्रोलिंग व तांत्रिक तपासाच्या आधारे एका सराईत मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या चौकशीत शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कृष्णा उमेश आंतरकर (वय २६, रा. पाथर्डी, […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये गेल्या अवघ्या सात महिन्यांत तीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याने औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत घडलेल्या या तीन घटनांनंतरही अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नेमक्या कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने ७२ वर्षीय शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण 

न्हावरे (अक्षय टेमगिरे) मांडवगण फराटा (ता. शिरुर) दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन ७२ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला हाताने तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सागर विश्वास गव्हाणे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..