Leader

शिरूर नगरपरिषद निवडणूक! नाट्यमय घडामोडींनी राजकीय वातावरण निघाले ढवळून…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या नाट्यमय घटनांनी शहराचे राजकीय तापमान शिगेला पोहोचले. महाविकास आघाडी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनी नगराध्यक्षपदासह सर्व २४ जागांवर स्वबळावर उमेदवारी दाखल केल्याने आगामी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीत प्रथमच चार पक्ष प्रत्यक्ष पक्षीय चिन्हावर रिंगणात उतरल्याने तसेच अपक्ष उमेदवार […]

अधिक वाचा..

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून धिंगाणा घालणाऱ्या वाळू माफियांनी घोड धरण अक्षरशः ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धरणातील अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक बोटी तीन वेळा फोडूनही वाळू माफियांचे वाळू चोरण्याचा सपाटा चालुच आहे. याबाबत वेळोवेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने याबाबत वेळोवेळी सडेतोड बातम्या केल्या […]

अधिक वाचा..
election-result

शिरूर नगराध्यक्ष, नगसेवक निवडणूकीत पाच अर्ज अवैध, लक्ष आता माघारीकडे…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत मंगळवारी (ता. १८) झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदाचे दाखल झालेले सर्व नऊ अर्ज वैध ठरले असून, नगरसेवकपदासाठीच्या एकूण १९३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरले. यामुळे आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. छाननी प्रक्रियेत पाच अर्ज बाद…. निवडणूक […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील जनाबाई दुर्गे यांचे निधन

शिंदोडी (प्रतिनिधी) येथील जनाबाई ज्ञानदेव दुर्गे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, मुलगी, जावई, नातवंडे, असा परीवार आहे. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल दुर्गे यांच्या त्या मातोश्री होत.  

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; डरकाळ्यांनी धास्तावलेले ग्रामस्थ…

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर, जुन्नरसह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत बिबट्याच्या उपद्रवाचे आणि मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, प्रशासन पातळीवर मात्र पुरेसे गांभीर्य नसल्याचेच दिसत आहे. वनविभागाच्या तोकड्या उपाययोजनांपुढे बिबट्या भारी ठरत असताना आणि गेल्या काही दिवसात जांबुत, पिंपरखेड सह तालुक्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जुन्नर वनविभागांतर्गतही बिबट्याची समस्या आ वासून उभी असताना कामातील […]

अधिक वाचा..
Leader

ZP, पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला…

पुणे: राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, याबाबतची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याचे म्हटले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. आधी राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची […]

अधिक वाचा..
karde-karegaon-road

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमी नंतर रस्त्याच्या दुरुस्तीच काम सुरु…

शिंदोडी (तेजस फडके): ‘करडे–कारेगाव रस्त्यावर तब्बल ३०० खड्डे’ असे वृत्त www.shirurtaluka.com ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला खडबडून जाग आली आणि त्यांनी तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या अनेक कामगारांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे आभार मानले आहेत. करडे–कारेगाव रस्ता झाला खड्ड्यांचा मार्ग; एक-दोन नव्हे […]

अधिक वाचा..

Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात चालणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशावर शिरुर महसुल विभागाने पुन्हा एकदा कारवाई करत एक वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट आणि वाळू वाहून नेणारी फायबर बोट जिलेटीनच्या साह्याने उध्वस्त केली. गेल्या सहा महिन्यातली महसुल विभागाची हि चौथी कारवाई असुन घोड धरणात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीचा बुधवार (दि १२) […]

अधिक वाचा..
leopard

Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पिंपरखेड आणि जांबुतनंतर आता वाघाळे हे गावही बिबट्याच्या हल्ल्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. वाघाळे गावात काल (दि १३) रोजी येथील बाळासाहेब रमाजी थोरात यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने तब्बल दहा शेळ्या ठार केल्या. परंतु माणसांची चाहूल लागताच तो क्षणात पसार झाला, पण गावात मात्र आरडाओरडा, गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले. वाघाळे […]

अधिक वाचा..
leopard

चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…

अहिल्यानगर : बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रियांका सुनील पवार (वय ५) असे बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीचे नाव आहे. रियांका बुधवारी (ता. १२) सायंकाळी घरासमोर शेकोटीजवळ खेळत होती. यावेळी तिची आई देखील बाहेरच होती. घराजवळील तुरीच्या शेतातून आलेल्या […]

अधिक वाचा..