एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! आरक्षण नसतानाही महापालिकांवर शिवसेनेच्या लाडक्या बहिणींचा शिक्का

मुंबई: महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यभर महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये यंदा अनपेक्षितपणे महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही महापालिकांमध्ये महापौरपद महिलांसाठी आरक्षित नसतानाही शिवसेनेने महिला नगरसेविकांवर विश्वास टाकत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

जनतेच्या जमिनीवर कर्ज नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या नात्यात विकास?

१५ एकरांवर १०० कोटींचं कर्ज? रनाळा ‘गुप्त स्मार्ट सिटी’ झाली आहे का नागपूर: महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहतेय, असं सत्ताधारी वारंवार सांगतात. मात्र ही गंगा नेमकी कुणासाठी आणि कुठे वाहतेय, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील रनाळा गावातील १५ एकर जमिनीवर तब्बल १०० कोटी रुपयांचं कर्ज मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय आणि […]

अधिक वाचा..

कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विदीप जाधव कुटुंबियांना भावनिक सांत्वन

सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःच्या वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राने राजासारखं मन असलेला नेता गमावला; अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रशांत जगताप भावुक

मुंबई: महाराष्ट्राचे लाडके नेते, आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दादांच्या जाण्याचा धक्का आजही स्वीकारणं कठीण असल्याचं सांगत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी ज्या ठिकाणी अजितदादांना मुखाग्नी देण्यात आला, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दादांसोबतच्या २४ वर्षांच्या सहवासातील असंख्य आठवणी मनात दाटून आल्याने प्रशांत जगताप भावुक झाले. […]

अधिक वाचा..

अजित पवार विमान अपघातातील पायलट जिवंत” सोशल मीडियावरील अफवांमागचं नेमकं सत्य काय

मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं आहे. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातानंतर सोशल मीडियावर एक गोंधळजनक माहिती व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे. ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या विमानाचा पायलट जिवंत असल्याचा दावा […]

अधिक वाचा..

मुंबई हादरली! ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, ८ मुलींचा समावेश, पोलिसांचा हाय अलर्ट

मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून, यामध्ये ८ मुलींचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता झाल्याने मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहेत. […]

अधिक वाचा..

अखंड महाराष्ट्राच्या कुलदैवताच्या नगरीत काठ्यांची हाणामारी! भाविकांत भीतीचे वातावरण

जेजुरी (पुणे): अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गड परिसरात आज घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भक्ती, भंडारा आणि ‘येळकोट येळकोट’च्या जयघोषासाठी ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी किरकोळ वादातून थेट काठीहाणामारी झाल्याने जेजुरीची प्रतिमा मलीन झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका दुकानावर भंडारा […]

अधिक वाचा..

समोरच मृत्यू आला! दारूच्या नशेत रस्त्यावर इनोव्हा चालकाकडून हिट अँड रनचा थरार

१५ जण जखमी, ४ वाहतूक पोलीसही बाधित सांगली: कुणी कामावरून घरी परतत होतं, कुणी बाजारातून भाजी घेऊन निघालं होतं, तर कुणी कर्तव्यावर तैनात राहून रस्ता सुरक्षित करत होतं. मात्र पुढच्याच क्षणी मृत्यू समोर येईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. सांगली शहरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं. सांगली शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गणपती […]

अधिक वाचा..

संजय गांधी ते अजित पवार! विमान अपघातांत संपणारी राजकीय कारकीर्द

विमान अपघातांत मृत्यू झालेल्या नेत्यांची भयावह मालिका बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. धावपट्टीवर उतरत असतानाच विमान कोसळून भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक आणि फ्लाइट अटेंडंट यांचा मृत्यू झाला. विमान अपघातात राजकीय नेत्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच […]

अधिक वाचा..

धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सांगली: वाळवा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथील जाहीर सभेत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. “धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत” असा संदेश देत त्यांनी मतदारांना धनुष्यबाणासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

अधिक वाचा..