जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे कल स्पष्ट; भाजप आघाडीवर

सोलापुरात दिग्गजांच्या नातेवाईकांत रंगली चुरशीची लढत सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ७५ जागांवर आघाडीवर असून शिवसेना ४१, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, काँग्रेस २२, ठाकरे गट १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, […]

अधिक वाचा..

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू; पहिल्या कलात महायुतीची आघाडी

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या मतदानात जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निकाल LIVE: राष्ट्रवादीचा पहिला विजय,  भाजप-शिंदे गटाची राज्यात आघाडी

मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून टपाल मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता ईव्हीएममधील आकडे समोर येत आहेत. या निकालांमध्ये माढा तालुक्यातून पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे. माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालांचा थरार! नेत्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, अनेक ठिकाणी अटीतटीची आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळत आहे. यावेळी राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याने निवडणुकीला वेगळीच रंगत आली आहे. पक्षीय संघर्षासोबतच वैयक्तिक आव्हाने आणि घराणेशाहीचा प्रभाव यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये अनेक […]

अधिक वाचा..

अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडेबोल; म्हणाले…

विचार करण्याचा प्रश्नच नाही; सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नेत्या रुपाली चाकणकर यांना जोरदार शब्दांत सुनावले आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत “विचार केला […]

अधिक वाचा..

भावाच्या अंत्यदर्शनाला आलेली बहीणही काळाच्या पडद्याआड

कणेगाव: वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे एका पाठोपाठ घडलेल्या दोन मृत्यूंनी संपूर्ण गाव हादरून गेले आहे. सत्तर वर्षांचे राजेंद्र गोविंद पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या बहिणीचाही दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे कणेगावसह बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. कणेगावचे रहिवासी राजेंद्र गोविंद पाटील (वय 70) यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. शनिवारी […]

अधिक वाचा..

आकाशात डॉक्टर ठरला देवदूत! गोवा–मुंबई विमानात अंतिम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याने वाचवला सहप्रवाशाचा जीव

        मुंबई: वैद्यकीय शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून, आपत्कालीन प्रसंगी एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी असते, याचा प्रत्यय नुकताच गोवा ते मुंबई या विमान प्रवासादरम्यान आला. पालघर जिल्ह्यातील वेदांत मेडिकल कॉलेजचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आणि वसईचा रहिवासी असलेल्या डॉ. आर्यन लोलयेकर यांनी प्रसंगावधान दाखवत एका सहप्रवाशाला अक्षरशः जीवदान दिले. ही घटना ३ फेब्रुवारी […]

अधिक वाचा..

१२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार

राज्यात ६६.२८ टक्के मतदान मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. राज्यभरातील २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. […]

अधिक वाचा..

वाढदिवस माणुसकीचा! एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जे.जे. रुग्णालयात नवमाता व बालकांना वस्त्रदान

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे केवळ राजकीय सोहळा नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा उत्सव असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात नवमाता व नवजात बालकांसाठी वस्त्रदानाचा हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. हा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला. […]

अधिक वाचा..