देवमाणूसच्या सेटवर आई–लेकाचं नातं जिवंत

अपर्णा क्षेमकल्याणी यांनी ऑनस्क्रीन लेकासाठी विणला खास मफलर मुंबई: मालिका आणि चित्रपटांमधील कलाकारांचे पडद्यामागील नाते कसे असते, याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. सोशल मीडियामुळे आता हे नातेसंबंध, त्यामधील आपुलकी आणि भावूक क्षण चाहत्यांसमोर येत आहेत. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मधला अध्याय सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेतील गोपाळ, लाली, आप्पा, सुधाकर, रंजना, हृतिक, […]

अधिक वाचा..

सोयाबीन पावणेसहा, तूर आठ हजारांवर; बाजारपेठेत भाववाढ, आवक मात्र मंद

मुंबई: बाजारपेठेत सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असली तरी आवक मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत असून, मागील १५ ते २० दिवसांपासून दररोज नियमितपणे दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीन डीओसी (ढेपी)लाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. ढेपीच्या दरात वाढ झाल्यामुळे […]

अधिक वाचा..

जरांगे पाटलांच्या विधानानं घातपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; मुंडेंवर थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या विधानामुळे घातपाताचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. यातील अमोल खुणे या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे. […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी इंद्रजीत जाधव 

पुणे (प्रतिनिधी): पुणे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी इंद्रजीत जाधव तर सचिवपदी मनोहर वन्नम यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य लिपिक वर्गीय संघटना क्र. ६१५ अंतर्गत पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या संघटनेत हा महत्त्वाचा नेतृत्वबदल झाला आहे. सन २०१५ पासून जिल्हाध्यक्ष म्हणून शेखर गायकवाड व सचिव म्हणून किशोर कुलकर्णी हे कार्यरत होते. […]

अधिक वाचा..

पुणे बार असोसिएशनच्या खजिनदारपदी ॲड अंजली बांदल यांचा ३,२३९ मताने दणदणीत विजय

वाघोली (प्रतिनिधी): पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत खजिनदारपदासाठी ॲड अंजली बांदल यांनी सर्वाधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये बुधवारी (दि ४) फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तर गुरुवारी (दि ५) फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. या अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी […]

अधिक वाचा..

मेघालयातील ताशखाई कोळसा खाणीत भीषण स्फोट; किमान १० कामगारांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर

शिलाँग: मेघालयातील ताशखाई परिसरात असलेल्या एका कोळसा खाणीत भीषण स्फोट होऊन किमान १० कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, मेघालय पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खाणीत अडकलेल्या इतर कामगारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर […]

अधिक वाचा..

अंजली दमानिया यांच्याविरोधात राष्ट्रवादीची कायदेशीर कारवाई; रूपाली चाकणकर आक्रमक

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीने काढल्याचे सांगितले जात असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांना फेटाळत पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून अंजली दमानिया यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

फेब्रुवारी २०२६ पासून UPI चे नवे नियम लागू; Google Pay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांवर थेट परिणाम

मुंबई: सध्या डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत असून, UPI द्वारे होणारे ऑनलाइन पेमेंट हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अशातच UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी २०२६ पासून UPI च्या नियमांमध्ये मोठे बदल लागू करण्यात आले असून, याचा थेट परिणाम Google Pay, PhonePe आणि Paytm वापरकर्त्यांवर होणार आहे. हे बदल डिजिटल व्यवहार […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात रेबीजचा बळी! पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने उच्चशिक्षित युवकाचा मृत्यू

दौंड: खामगाव (ता. दौंड) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे झालेल्या रेबीज आजाराने एका उच्चशिक्षित युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गाडीमोडी परिसरातील रहिवासी महेश राजेंद्र नागवडे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. महेश नागवडे हे दहिटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखापाल म्हणून कार्यरत होते. मितभाषी, संयमी आणि हसतमुख स्वभावाच्या महेशच्या […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार; नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

रत्नागिरी: शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून २०२१ ते २०२६ या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..