लावणी हवी, लावणीच्या नावाखालील अश्लीलता नको!

मुंबई: लावणी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली कला. तिच्या ठेक्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे, शब्दांत लोकजीवन आहे आणि अदाकारीत शतकानुशतकांची सांस्कृतिक परंपरा आहे. तमाशा, लोकनाट्य, वग, लोकसंगीत आणि मेळे या लोककलांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला समृद्ध केले आहे. मात्र, या परंपरेच्या नावाखाली रंगमंचावर आणि सार्वजनिक कार्यक्रमांत सुरू असलेल्या काही प्रकारांकडे पाहिले की प्रश्न पडतो—ही लावणी आहे की लावणीच्या […]

अधिक वाचा..

गडचिरोलीतील क्रीडा विकासाला बूस्टर; ८०.१२ कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई: नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील युवकांना क्रीडा क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यासाठी टप्पा-२ अंतर्गत ८०.१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ही माहिती दिली. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील खेळाडूंना दर्जेदार […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टपासून लागू; धर्मांतरासाठी 60 दिवस आधी सूचना बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 पासून या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. यासंदर्भातील राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या मार्च 2026 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेसह विधान परिषदेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. जबरदस्ती, […]

अधिक वाचा..

मुंबईत राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीला गती

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. मुंबईस्थित कोल्हापूरकरांची गेल्या ५० वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन विधान भवनात उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली. स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करून त्याबाबत तत्काळ मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र देण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री […]

अधिक वाचा..

मनोहर मामा भोसले प्रकरणात नवा ट्विस्ट; शिक्षण क्षेत्रातील दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदू बाबा मनोहर मामा भोसले प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून कथितरित्या जमा झालेल्या पैशांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिस तपासातून समोर आला आहे. या प्रकरणात करमाळ्यातील दत्तकला शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर […]

अधिक वाचा..

ग्रामसभेतील गोंधळानंतर ग्रामसेवकाचा मृत्यू; सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पारोळा : शिवरे दीगर येथे १७ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर ग्रामसेवक पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, ज्ञानेश्वर अशोक पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांत सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवरे दीगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा १७ ऑगस्ट […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात मोठी वाढ; मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा फडणवीसांना अधिकार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारात महत्त्वाची वाढ करणारे ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६’ राज्य सरकारने अधिसूचित केले आहेत. नव्या नियमांनुसार, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना आणि शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. नव्या नियमांमुळे मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांना थेट हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. […]

अधिक वाचा..

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला आव्हान

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू झालेला राजकीय वाद आता उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचणार आहे. बहुमत नसतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता मिळवल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीवर अपेक्षित वेगाने सुनावणी होत नसल्याने आता उच्च न्यायालयात याचिका […]

अधिक वाचा..

ठाणे जिल्ह्यात SIR चे काम 100 टक्के पूर्ण

ठाणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या 74 लाख 50 हजार 515 मतदारांचे 100 टक्के EF प्रिंट काढण्यात आले आहे. त्यानंतर […]

अधिक वाचा..

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: राज्यातील एसटी बसस्थानके आणि एसटी प्रवास महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या मागणीची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. बसस्थानकांवरील सुविधा आणि आवश्यक सुधारणांचा आढावा घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत. विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम […]

अधिक वाचा..