महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; डॉ.नीलम गोऱ्हे 

मुंबई: “माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलीकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच आमच्या आदरणीय भारतीय संसदेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. आपल्या लोकसंख्येतील महिलांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता, हे एक स्वागतार्ह पाऊल आहे”, […]

अधिक वाचा..

वर्षाच्या अखेरीस पुन्हा महागाईचा ताप; ॲड.अमोल मातेले

गॅस सिलेंडर महागल्याने सामान्य माणूस होरपळला मुंबई: महागाईने पुन्हा एकदा सामान्य जनतेला आपल्या कचाट्यात ओढले आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्यांदा वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. “घरातले चूलबुडगे आणि बाजारातले दरबुडगे” या म्हणीप्रमाणे आता घरगुती स्वयंपाकासाठीही जास्त खर्च करावा लागत आहे. आधीच वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना, गॅस सिलेंडरच्या किंमतीत […]

अधिक वाचा..

देवाभाऊ, पुन्हा येताहेत…

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० डिसेंबरला मतदान झाले आणि २३ डिसेंबरला मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्याचे स्पष्ट झाले. भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा सत्ताधारी महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. महायुतीचे २३५ आमदार निवडून आले. महाराष्ट्रात विधानसभेच्या झालेल्या सलग तीनही निवडणुकांमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून येत […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत २१०० रुपये; जाणून घ्या का

महाराष्ट्र सरकारची *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते. मात्र, काही महिलांना पुढच्या हप्त्यापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्जाची छाननी सुरू १५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आता अर्जांची छाननी सुरू असून, ज्यांच्या अर्जांमध्ये […]

अधिक वाचा..

बेशिस्त वर्तन करून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर काँग्रेस कारवाई करणार

मुंबई: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांवर प्रदेश काँग्रेसकडून कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंटी शेळके यांना काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोटे […]

अधिक वाचा..

मतदानानंतरच्या वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा

एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या […]

अधिक वाचा..

हेल्मेट झाले सक्तीचे; दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट अनिवार्य

वाहतूक सुरक्षेसाठी मोठा निर्णय आता दुचाकी चालक आणि सहप्रवासी दोघांनीही हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे.वाहतूक विभागाने हा कठोर नियम लागू केला असून अपघातांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. कारवाई दोघांवर होणार विना हेल्मेट पकडल्यास चालक आणि सहप्रवासी यांच्यावर स्वतंत्र दंड ई-चलन प्रणालीत सुधारणा करून सहप्रवाशांवरही दंड आकारण्यासाठी तयारी पूर्ण. का घेतला निर्णय अपघातांमध्ये विना […]

अधिक वाचा..

स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढले गैरप्रकार…

मुंबई: नवी मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणा‌ऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न‌वीमुंबई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे. याची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना असे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात […]

अधिक वाचा..

लहान मुले व महिलांच्या मूलभूत हक्कांच्या होत असलेल्या उल्लंघनाबाबत कायदेशीर कारवाई करा…

मुंबई: भिवंडी, जिल्हा ठाणे येथे साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून साठ हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार १७ नोव्हेंबर २४ रोजी घडला आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. लहान मुले, महिला, शोषित व वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या मूलभूत हक्कांचे होत असलेले […]

अधिक वाचा..