वाघोली तलाठी कार्यालयातील दोन खाजगी व्यक्तींवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून केली अटक

महाराष्ट्र मुख्य बातम्या

वाघोली: वाघोली येथील एका व्यक्तीने पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर तलाठी कार्यालयातील मदतनीस आणि एका अन्य व्यक्तीने तलाठी यांच्याकडून काम करुन देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी वाघोली येथील तलाठी कार्यालयातील दोन खाजगी मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी वाघोली येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. तलाठी यांचे मदतनीस भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तलाठी यांच्याकडून काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता जागेची नोंद सात बाऱ्यावर घेण्यासाठी गिरी यांनी तलाठी पतंगे यांच्यासाठी ४५ हजार रुपये व त्यांच्या स्वतःसाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यास लगड यांनी सहाय्य केले म्हणून दोघांवर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली येथील तलाठ्याच्या नावे 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी कार्यालयातील दोन खाजगी मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली असुन भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. आव्हाळवाडी) आणि संजय मारूती लगड (वय ५३, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे असुन लोणीकंद पोलिस पुढील तपास करत आहेत.