होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाआंदोलन करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन […]

अधिक वाचा..

फेरीवाला प्रश्नावर उच्च न्यायालयाचे कडक निर्देश

५ आठवड्यांत ९९ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचे आदेश मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला कडक शब्दांत फटकारले असून, न्यायालयाने संरक्षित ९९ हजार फेरीवाल्यांना पाच आठवड्यांत ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने बुधवारी झालेल्या सुनावणीत “तीच तीच कारणे देताय, हे म्हणजे पालथ्या […]

अधिक वाचा..

फडणवीसांच्या नव्या पुण्यात गुन्हेगारी वाढली; मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

पुण्यातील वाढत्या अत्याचार, ड्रग्ज, कोयता गँग आणि भूमिगत रस्ता प्रकल्पातील भ्रष्टाचारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका पुणे: “देवेंद्र फडणवीस हे ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ असल्याचे पोस्टर्स शहरभर लावले जात आहेत, मात्र त्यांच्या काळात पुण्यात महिलांवरील अत्याचार, ड्रग्जचा विळखा, कोयता गँग आणि गुंडगिरी वाढली आहे,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालय येथे १३२ हून अधिक […]

अधिक वाचा..

तूर-हरभरा खरेदीला मुदतवाढ; हरभरा खरेदीचे उद्दिष्टही वाढले

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात 58 हजार 632 मेट्रिक टनांची वाढ करण्यात आली असून आता राज्यात एकूण 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार आहे, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी […]

अधिक वाचा..

एमएसएफडीएच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण; उच्च शिक्षण क्षेत्राला डिजिटल बळ

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नव्या सुधारित संकेतस्थळाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना संवेदनशील बनविण्यावर भर

मुंबई: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि अध्यापकांना अधिक संवेदनशील व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘मानससूत्र – विद्यार्थी मानसिक आरोग्य व कल्याण’ या तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे येथे आयोजित या कार्यक्रमास उच्च व […]

अधिक वाचा..

‘यूजी 4.0’मुळे अध्यापक बदलत्या शिक्षण व्यवस्थेशी सुसंगत होतील; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत कौशल्ये आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगत ‘यूजी 4.0’ हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अध्यापकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) […]

अधिक वाचा..

जनतेच्या प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही; जय पवार यांच्या पहिल्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय अजितदादा पवार यांनी बारामती येथे आजपासून जनता दरबार उपक्रमाची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांच्या विविध अडचणी आणि समस्या जाणून घेत जय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या समस्या जलदगतीने सोडवण्यावर त्यांनी […]

अधिक वाचा..

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नीलम गोऱ्हे यांची तातडीची भेट; न्यायासाठी ठाम भूमिका

पालघर: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेची नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेत पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबाची मनःस्थिती जाणून घेत न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, “या अत्यंत गरीब आणि दुर्बल कुटुंबाची एकच मागणी […]

अधिक वाचा..