शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. याचाच गैरफायदा घेत शिरुरच्या पुर्व भागातील गुनाट (ता. शिरुर) येथील एका माजी सरपंचांच्या नातेवाईकाने घोड धरणातुन रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर वाळू चोरी करण्याचा सपाटाच लावला असुन त्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली […]

अधिक वाचा..

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रम (माळवाडी) परीसरातील आश्रमाची संरक्षण भिंत, पिण्याच्या पाण्याच्या सिमेंटच्या टाक्या तसेच आश्रमाच्या आवारातील नारळ, कडुनिंब व इतर झाडे जेसीबीच्या साहाय्याने जबरदस्तीने पाडुन दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात सुदर्शन दत्तराज सिन्नरकर यांनी फिर्याद दाखल केल्याने पाच जणांविरोधात गुन्हा […]

अधिक वाचा..

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती , माञ रांजणगाव गणपती येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इतिहासात प्रथमच सन २०२३-२४ ची बँक पातळीवरील वसुली मार्च २०२४ अखेर 100 टक्के वसुली झाली असुन विकासोच्या नवीन इमारतीसाठी 34 लाख रुपयांची मुदत ठेव (Fix Deposit) रांजणगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील निफॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोदामाला अचानक लागलेल्या आगीत गोदामासह कार्यालयीन केबिन व साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याचे रांजणगाव MIDC पोलिसांनी सांगितले.   याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव MIDC तील आयटीआयच्या बाजुला असलेल्या या गोदामाला शनिवार (दि २७) […]

अधिक वाचा..

शिंदेवाडी येथे बैलगाडा प्रेमींची निराशा…भांडण झाल्याने शर्यती अर्ध्यातच बंद; एकजण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता. शिरुर) येथील शिंदेवाडी येथे आज रविवार (दि.२८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती सुरु असताना बैलगाडा घाटातच स्थानिक नागरिकांमध्ये अचानक वादावादी झाल्याने शर्यती बंद करण्यात आल्या. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले.   शिंदेवाडी येथील स्थानिक दोन कुटुंबात ही वादावादी झाली असुन […]

अधिक वाचा..

तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोड (NH548D) वर न्हावरे दिशेने जाणारी भरधाव वेगात असलेली (हुंदाई आय 20) कार निमगाव फाट्याजवळ गलांडे फार्म हाऊस समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्याची घटना दुपारी 4 सुमारास घडली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की हि कार रस्त्यावर पासुन सुमारे शंभर […]

अधिक वाचा..
tanaji-dharne-helpata

शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीच्या लेखकाचा विद्यालयात सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीचे लेखक व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे (न्हावरे) माजी विद्यार्थी तानाजी धरणे यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे (शिरुर)च्या वतीने तानाजी धरणे यांच्या ‘हेलपाटा’ या कादंबरीला ८ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मध्ये पी […]

अधिक वाचा..

घोलपवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे सामाजिक व धार्मिक एकोपा वाढेल; चंद्रकांत वांजळे

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) येथील बांधण्यात आलेले दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे परिसरातील सामाजिक व आध्यात्मिक एकोपा वाढून तरुणांमध्ये एकनिष्ठा वाढेल असे प्रतिपादन किर्तनकेसरी ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केले. घोलपवाडी (ता. शिरुर) येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार मुर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रमानिमित्त किर्तनकेसरी ह भ प चंद्रकांत महाराज […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील तिनही पोलिस स्टेशन हद्दीत ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत DYSP नी घेतली बैठक

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिस हद्दीत जातेगांव बुद्रुक आणि आरणगाव मध्ये पडलेल्या दरोड्याच्या अनुषंगाने शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन या तीन ठिकाणी स्वतंत्र बैठक घेतली.   शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन या […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सरचिटणीसपदी सुरज वाळुंज यांची निवड

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी (ता. शिरुर) येथील युवा कार्यकर्ते सुरज गोविंद वाळुंज यांची नुकतीच पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. भोसरी (पुणे) येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, युवा नेते आणि उद्योजक राहुल करपे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.   […]

अधिक वाचा..