घोलपवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे सामाजिक व धार्मिक एकोपा वाढेल; चंद्रकांत वांजळे

शिरूर तालुका

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) येथील बांधण्यात आलेले दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे परिसरातील सामाजिक व आध्यात्मिक एकोपा वाढून तरुणांमध्ये एकनिष्ठा वाढेल असे प्रतिपादन किर्तनकेसरी ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केले. घोलपवाडी (ता. शिरुर) येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार मुर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रमानिमित्त किर्तनकेसरी ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

 

श्री हनुमान मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम प पु गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ यांच्या हस्ते रविवार (दि 21) रोजी धार्मिक विधीने भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. वसंत तानाजी घोलप यांच्या स्मरणार्थ घोलपवाडी येथे उद्योजक चेतन वसंत घोलप यांनी स्वखर्चाने भव्य दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर बांधले असुन या निमित्ताने मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी किर्तन केसरी चंद्रकांत महाराज वांजळे यांचे हरिकीर्तन प पु शंकर महाराज पांचाळ यांच्या उपस्थितीत कलश व हनुमान मूर्ती ची भव्य मिरवणूक ढोल ताशा व झाजपथक या वाद्यांच्या गजरात संपन्न झाली. यावेळी महाप्रसाद भजन, पाद्य पूजा, कलशारोहण सोहळा महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हनुमान तरुण मंडळ आणि घोलप परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत