पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सरचिटणीसपदी सुरज वाळुंज यांची निवड

राजकीय शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी (ता. शिरुर) येथील युवा कार्यकर्ते सुरज गोविंद वाळुंज यांची नुकतीच पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. भोसरी (पुणे) येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, युवा नेते आणि उद्योजक राहुल करपे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

 

सुरज वाळुंज यांची आई शारदा वाळुंज तसेच वडील गोविंद वाळुंज हे दोघेही शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातच राजकीय पार्श्वभुमी असल्याने त्यांना आई-वडिलांकडुनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. शिंदोडी गावातील सामाजिक कामातही त्यांचा मोठया प्रमाणात सहभाग असतो.

 

या निवडीनंतर बोलताना सुरज वाळुंज म्हणाले, सध्या देशात आणि राज्यात राजकारणाचा स्तर घसरत चालला असुन सध्याचे राजकीय नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची तत्व आणि निष्ठा सोयीनुसार बदलताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या जडण-घडणीत शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे शरद पवार यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असुन पदाच्या माध्यमातुन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत