shirur-mla-mauli-katke

शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी शिरूर नगरपालिकेला माजी आमदार लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या नावाचा वापर केला तर जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांच्याच विरोधात प्रचार करत आहेत. आमदार माऊली कटके हे दुटप्पीपणा करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान एका भाषणादरम्यान माजी आमदार लोकनेते स्व. […]

अधिक वाचा..

ZP निवडणूक काळात घोड धरणात वाळू माफिया सक्रिय अन प्रशासन मात्र निष्क्रिय…?

शिंदोडी (तेजस फडके): सध्या शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु असुन महसूल व पोलिस प्रशासन आचारसंहिता, बंदोबस्त आणि राजकीय कार्यक्रमांत इतके गुरफटले आहे की घोड धरण थेट वाळू माफियांच्या ताब्यात गेल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रशासन गाफील असल्यामुळे घोड धरणात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. तरीही “प्रशासन जाणीवपुर्वक […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचा रुट मार्च

रांजणगाव गणपती (तेजस फडके): दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 तसेच आगामी महत्त्वाचे सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आज मंगळवार दिनांक 3 […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवैध दारु वाहतुकीचा पर्दाफाश; कारेगाव येथून लाखोंचा मुद्देमाल जप्त

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु वाहतुकीचा गंभीर प्रकार समोर आला असून रांजणगाव MIDC पोलिसांनी कारेगाव येथील यश इन चौक परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ४ लाख ४९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारु वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १.३० […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC परिसरात बेकायदेशीर दारू वाहतुकीचा पर्दाफाश; दोन तरुणांना अटक 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर देशी दारु वाहतुकीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी दोन तरुणांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून सुमारे ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता राजमुद्रा चौक, हॉटेल कृष्णराज […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई गावच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; राधाकृष्ण विखे पाटील साधणार शेतकऱ्यांशी संवाद

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कान्हूर मेसाई गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर आज (दि. 4) रोजी दुपारी 2 च्या दरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गावातील शेतकरी बांधव आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट चर्चा होणार असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरूर तालुक्यातील नागरिकांचा तृप्ती सरोदे यांच्यावरचा विश्वास उडाला; कारण…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात अजित दादांच्या राष्ट्रवादी कडून तृप्ती सरोदे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होत्या. परंतु, पक्षाने ऐन वेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतला. परंतु त्यानंतर काही दिवसातच त्यांनी शिवसेनेकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. काही करून निवडणूक लढविणारच, […]

अधिक वाचा..
jyoti-pachundkar

रांजणगाव-कारेगाव मूळ गटाचा कायापालट करणार : ज्योती मानसिंग पाचुंदकर

कान्हूर मेसाई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या संकल्पनेला अभिप्रेत असलेला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांची समस्या सोडवून प्रगतीपथावर आणून त्याचा कायापालट करणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी दिले आहे. View this post on Instagram रांजणगाव कारेगाव मुळ जिल्हा परिषद गटात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ३ लाखांहून अधिक मतदार; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण ३ लाख १ हजार ९५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ५३ हजार ४२५ पुरुष, १ लाख ४८ हजार ५१८ महिला आणि १३ इतर मतदार यांचा समावेश आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांपैकी पाबळ गटात सर्वाधिक ४६ हजार ६२० मतदार […]

अधिक वाचा..

पाबळ हादरले! घरगुती वादातून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पाबळ (सुनिल जिते): पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), […]

अधिक वाचा..