शिरूर (तेजस फडके) : शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी शिरूर नगरपालिकेला माजी आमदार लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या नावाचा वापर केला तर जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांच्याच विरोधात प्रचार करत आहेत. आमदार माऊली कटके हे दुटप्पीपणा करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान एका भाषणादरम्यान माजी आमदार लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांची इच्छा होती की, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती नगराध्यक्ष असावा असं वक्तव्य केल होतं. त्यानंतर स्व. बाबुराव पाचर्णे यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे यांनी या वक्तव्याचे खंडण करत फक्त निवडणुकांपुरता स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या नावाचा वापर करु नये, असे ठणकावून सांगितले होते.
View this post on Instagram
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू असुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी समोरासमोर लढत आहे. भाजपा कडून जिल्हा परिषद साठी लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे तर राष्ट्रवादी कडून वृषाली वाळके यांची समोरासमोर लढत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारासाठी माऊली कटके जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात दौरा करत आहेत. त्यामुळे नगरपालिकेला स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराला सुरवात करणारे आमदार कटके मात्र स्व. पाचर्णे यांच्याच पत्नीच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही आमदार कटके यांनी लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन आशिर्वाद घेतले होते. तसेच काही दिवसांपुर्वी झालेल्या शिरुर नगरपालिका निवडणुकीच्या वेळेसही स्व. पाचर्णे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन आशिर्वाद घेतले. लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या नावाचा वापर करुन मत मागायची आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र स्व. पाचर्णे यांच्या पत्नीच्या विरोधात प्रचार करायचा. त्यामुळे आमदार माऊली कटके यांचा दुटप्पीपणा उघड झाला असून, नागरिक उघडपणे बोलताना दिसत आहेत.
शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारच्या धडकेने चिमुकली उडाली चेंडूसारखी…
आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?
शिरूरकरांना पाणीटंचाई जाणवू देणार नाही; आमदार माऊली कटके
View this post on Instagram