omkar-walke-karegaon

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड…

कारेगाव (तेजस फडके) : “किरकोळ वाद… पण त्यातून उफाळलेला संताप… आणि शेवटी निर्दयी खून!” अशी थरकाप उडवणारी घटना शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. एका किरकोळ धक्काबुक्कीतून सुरु झालेला वाद एवढा चिघळला की, अखेर निष्पाप युवाकाच जीव गेला आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) याबाबत रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..

शिरुर; मनरेगा विहिर गैरव्यवहार प्रकरणी बीडीओंनी दिला स्थळ पाहणीचा आदेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या कामावर गंभीर शंका उपस्थित होत असून, या पार्श्वभूमीवर शिरुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ स्थळपाहणी करुन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत मच्छिंद्र बापूराव पवार यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत सुरेश विश्वनाथ देशमुख आणि प्रदीप सुरेश देशमुख […]

अधिक वाचा..

शिरुर; मनरेगा गैरव्यवहाराचा खोटा आरोप…? देशमुखांचा पवारांवर पलटवार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथे मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा मच्छिंद्र बापूराव पवार यांनी आमच्यावर खोटारडा आरोप केला आहे. तसेच हे आरोप खोडसाळ आणि निराधार असुन त्यांनी दिशाभुल केली असल्याचे प्रदीप सुरेश देशमुख यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले. देशमुख म्हणाले, “गट नं. ६१७ ची मी स्वतःच्या खर्चाने मोजणी करून […]

अधिक वाचा..

खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याने अखेर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले फेर चौकशीचे आदेश 

टाकळीहाजी येथील आरोग्य केंद्रातील वैदयकिय आधिकाऱ्यांचे प्रकरण शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता याबाबत स्थानिक नागरीक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष चौकशी समिती नेमली होती. परंतु […]

अधिक वाचा..
gayatri-ingle-shikrapur

शिरूर ! पुणे-नगर महामार्गावरील कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले…

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे) : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले आहे. मंगळवारी (ता. १) साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून, युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. गायत्री गजानन इंगळे (रा. शिक्रापूर, वय २२) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. युवती आपल्या अॅक्टीव्हा (एम.एच. […]

अधिक वाचा..

शिरुर; रामलिंग येथे श्रीमंत सरदार घराण्यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने महिलांचा गौरव

शिरुर (अरुणकुमार मोटे) नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करण्याची संधी आहे. स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात अनोखी कामगिरी करणाऱ्या महिलांचा “नवदुर्गा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला ऐतिहासिक छटा लाभली. सुभेदार तानाजी मालुसरे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मच्छिंद्र बापूराव पवार यांनी मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उद्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी उपोषण करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. नेमकं […]

अधिक वाचा..

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पराग अॅग्रो साखर कारखान्याचा ९ वा बॉयलर अग्नीप्रदिपन व गव्हाणपूजन सोहळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक ठरलेल्या पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. साखर कारखान्याचा सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या मंगलदिनी होत आहे. यानिमित्ताने कारखान्याचा ९ वा “बॉयलर अग्नीप्रदिपन व गव्हाणपूजन समारंभ” गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील भागांमध्ये मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर एकूण १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Based) अलर्ट सिस्टीम बसविण्यात आल्या आहेत. या प्रणालीत बिबट्याच्या शरीरावरील पॅटर्न ओळखला जातो आणि तो त्या मार्गावरुन गेल्यास त्वरित सायरन वाजतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना बिबट तेथे असल्याची कल्पना […]

अधिक वाचा..

भांबर्डे येथे नवरात्र उत्सवाची उत्साहपूर्ण सांगता; सातव्या दिवशी हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर (अरुणकुमार मोटे): नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी भांबर्डे (ता. शिरूर) येथे माता मळाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर उसळला. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी माता मळाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य व्यवस्था करण्यात आली होती. रोज .पहाटे पाच वाजता विधिवत पूजेनं उत्सवाला प्रारंभ होतो.तर सकाळी आठ वाजता […]

अधिक वाचा..