टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीविरोधात नऊ गावांचा संताप

६ ऑक्टोबरपासून उपोषणाची हाक; जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेवर ग्रामस्थांचा रोष शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील आरोग्य केंद्रावर नियुक्त वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. युवराज थोरात यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन व जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनाला राज्यभरातून तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्याध्यक्ष अनिलजी पलांडे यांनी शिक्षक संघटनेसमोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी व संघटनेची वाढ घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच राज्य सरचिटणीस मनोज […]

अधिक वाचा..

कवठे येमाईतील फत्तेश्वर व लाखनगाव – चांडोह पूल धोकादायक अवस्थेत; वाहतुकीसाठी बंद

दळणवळण ठप्प, नागरिकांमध्ये तीव्र संताप शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई-येथिल फत्तेश्वर बंधाऱ्यावरील पूल तसेच बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोहजवळील पूल जोरदार पावसामुळे धोकादायक स्थितीत गेले आहेत. फत्तेश्वर पुलाच्या बंधाऱ्याचा मोठा भाग प्रचंड पुराच्या पाण्याने उघडला गेला असून वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे. त्याचप्रमाणे बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोह पुलाची अवस्था […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महिलांसाठी डिजिटल आर्थिक साक्षरता मास्टर ट्रेनर प्रशिक्षण; ३० महिला बनल्या “ई-दोस्त”

शिरुर (तेजस फडके) ग्रामीण भागातील महिलांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करून आर्थिक स्वावलंबनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘आयटीसी मिशन सुनहरा कल आणि बायफ संस्था पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर येथे “डिजिटल आर्थिक साक्षरता मास्टर ट्रेनर प्रशिक्षण” यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणात विविध गावांमधील तब्बल ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या हातात डिजिटल तंत्रज्ञान […]

अधिक वाचा..

शिरुर; विद्युत वाहिनीवर बेकायदेशीर जाहिरात फलक; महावितरणची पोलिसांकडे तक्रार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथे थेट विद्युत वाहिनीवर चढून अज्ञात व्यक्तीने मुसळधार पाऊसात बेकायदेशीररीत्या जाहिरातीचे फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने उघडकीस आणला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) रांजणगाव पोलिसांकडे पत्र देत संबधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. पिंपरी दुमाला येथे दि २२ सप्टेंबर २०२५ […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला होता. मात्र महसूलमंत्री व शासनाने शेतरस्ते खुले करण्याच्या मोहिमेसह शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या पुढाकारामुळे अखेर हा शेतरस्ता खुला झाला. विशेष म्हणजे, सुरुवातीला मोठा विरोध असतानाही कसलाही पोलिस बंदोबस्त नसताना समन्वय साधत तणाव कमी करुन प्रशासनाने व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता […]

अधिक वाचा..

कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२५’ यंदा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. “शिवतीर्थ प्रतिष्ठान” आयोजित या उत्सवाची सुरुवात सोमवार दि २२ सप्टेंबर २०२५ रोजी झाला असुन संपूर्ण आठवडाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ग्रामस्थांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन देवीच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली. बाभुळसर खुर्द (ता. शिरुर) येथील सृष्टी सोसायटीतील रो हाऊसवर धाड टाकुन पोलिसांनी तब्बल २८ किलो वजनाचा सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार फरार आहे. दि २६ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने वाळू माफियां किंवा मुरुम माफिया यांच्या विरोधात दिलेली गोपनीय माहिती आणि तक्रारदाराच नाव संबंधित वाळू किंवा मुरुम माफिया पर्यंत सोयीस्करपणे पोहोचवायचं काम तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. शासनाच्या नियमांनुसार तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे […]

अधिक वाचा..

रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) कोल्हापूर कृती विभाग, कार्यसन पुणे व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत सुमारे २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त करुन तिघा संशयितांना जेरबंद केले. या प्रकरणी लाखोंचा मुद्देमाल हस्तगत झाला असून आरोपींविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा नोंदविण्यात […]

अधिक वाचा..