सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे…

कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही; अजित पवार नागपूर: सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीसांकडून अल्पवयीन व बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरांमध्ये शिरुर पोलिस स्टेशन वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, बी जे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त वाहन चालक यांच्या 42 वाहनांवर कारवाई करत 74 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. शिरुर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन…

नागपूर: शिंदे – फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरु […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र पोलिस भरती सराव प्रश्न…

1)देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे 2) भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरु करण्यात आले? 1.दिल्ली ✅ 2. महाराष्ट्र 3. आंध्र प्रदेश 4. चंदिगढ 3…………. या भागातील पठार मेवाड […]

अधिक वाचा..

भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार…

नागपूर: घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा […]

अधिक वाचा..

मुक्ताताई टिळक म्हणजे आदर्श कार्यकर्त्याचा वस्तूपाठ

पुणे: कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात शोकसंवेदना व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुक्तताई सदैव स्मरणात राहतील. मुक्तताई या भारतीय जनता पक्षच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत होत्या. संघटन विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या […]

अधिक वाचा..

फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण; अजित पवार

विधानसभा अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाचा सभात्याग नागपूर: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधीमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. यामुळे विधीमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे? कोणाच्या आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आले? […]

अधिक वाचा..

आमदार निवासस्थानात गैरसोय; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर…

सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे… नागपूर: आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चालल आहे, असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी केली. दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात कारच्या धडकेत दुचाकीवरील बापलेक जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठन फाटा येथून दुचाकीहून चाललेल्या बापलेकांना एका कारने धडक दिल्याने बापलेक जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथून संभाजी तरपेवाड त्यांच्या ताब्यातील एमएच २६ ए एक्स ७१८२ या दुचाकीहून त्यांचा मुलगा दर्शन याला घेऊन […]

अधिक वाचा..

सविंदणे परिसरात मुसळधार पावसाने पुल वाहून गेल्याने दळणवळण झाले ठप्प…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सध्या शिरुर तालुक्यात (दि. १७) रोजी रात्रीच्या सुमारास मोठा मुसळधार पाऊस पडला असून ओढया नाल्यांना मोठे महापूर आले आहेत. सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत. अनेक वर्षापासून येथे पुलाची मागणी होती. परंतू […]

अधिक वाचा..