शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील घोडनदीत एका व्यक्तीने आत्महत्या केली असुन सुमीत सुरेश कानेरकर (वय 32) रा. साई प्लाझा, मगर हॉस्पिटल पाठीमागे, शिरुर, मुळ रा. मु.पो, आर्वी ता. आर्वी, जि. वर्धा, असे मयत व्यक्तीचे नाव असुन याबाबत त्यांची पत्नी आरती सुमित कानेरकर (24 वर्ष) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमीत कानेरकर हे घरातुन रोज सांयकाळी शिरुर येथील डोंगरावर फिरायला रोज जात होते. मंगळवार (दि 27) रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे ते बाहेर फिरायला जातो असे सांगुन घरातुन निघुन गेले. परंतु ते रात्री घरी परत न आल्याने त्यांची पत्नी आरती हि शोध घेण्याकरीता शिरुर येथील डोंगरावर तसेच घोडनदी पुलावर गेली असता. त्यावेळी त्यांच्या पतीची मोटार सायकल घोडनदीकडेला उभी केलेली दिसली. त्यानंतर त्यांना घोडनदी पुलावर लोक जमा झालेले दिसले म्हणुन त्यांनी तिथं जावुन पाहिले. त्यावेळी त्यांच्या पतीचा मृतदेह घोडनदी पात्रात तरंगताना दिसला. या घटनेचा पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गवळी करीत आहेत.