व्यापारी संकुल भुमिपुजन स्थगितीमुळे टपरी व्यावसायिक नाराज

मुख्य बातम्या

विरोधी पक्षाचा शिरुर शहर टपरीधारकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देत केला जाहीर निषेध

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील व्यापारी संकुल भुमिपुजन शासकिय नियमांना व इतर पक्षीयांना डावलून करण्याचे राष्ट्रवादी पक्षाला चांगलेच महागात पडले असून ते स्थगित करावे लागल्याने शहरात राष्ट्रवादी पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. परंतू यात अनेक वर्षापासून विस्थापीत झालेल्या टपरीधारकांचे हाल होत असून त्यांच्यासाठी होणारी दुकाने आता लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे व्यापार संकुलनाचे भूमिपूजन कार्यक्रमात विरोधी पक्षाने अडथळा निर्माण केल्याने टपरीधारकांच्या वतीने विरोधी पक्षाचा तहसीलदारांना निवेदन देत जाहीर निषेध करण्यात आला आहे.

शिरुर शहरातील जुने नगर-पुणे रोडवर सुमारे ४५० टपरी व्यवसायिकांच्या टपऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या नावखाली सन २०१३ साली प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्याने हे टपरी व्यावसायिक विस्थापित होवून रोजगारास मुकले होते. अशा टपरी व्यवसायिकांच्या पुर्नवसनासाठी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार व नगरपरिषदचे सभागृह नेते प्रकाशशेठ धारिवाल यांनी शिरुर शहर व्यापार संकुलन तयार करुन त्यामध्ये त्यांना प्राधान्य क्रमाने टपरी व्यावसायिकांना दुकाने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार प्रथम टप्प्यातील व्यापारी संकुलनाचे भूमिपुजन शुक्रवारी (दि. १६) डिसेंबर रोजी बस स्थानक शेजारील जागेत होणार होते.

परंतू राजकीय पक्षाच्या विरोधाच्या व श्रेयवादाच्या राजकारणात होवू शकले नाही व गोरगरीब टपरीधारकांच्या पदरी निराशा पडली, अशा विकास कामात अडथळा आणणाऱ्या विरोधी पक्षाचा शिरुर शहर टपरी धारकांच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आलाआहे.

यावेळी हैदर शेख, बाजु गायकवाड, जावेद सय्यद, जलील खान, शब्बीर शाह, रामभाऊ घावटे, गोरख लोंढे गुलाबराव दसगुडे, कलीम सय्यद, गजानन पाचर्णे, ताराबाई बैनाड, वसंत गव्हाणे, शोभा ढेरे, सविताबाई निचीत, माऊली बारगळ, शशिकांत माने, अविनाश घोगरे व टपरी धारक कृती समीती संघटना, शिरुर हे उपस्थित होते.