Shirur Police Station

शिरुरच्या माजी उपसभापतीसह आठ जणांवर मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ, दमदाटी करत एकलव्य संघटनेच्या तालुका कार्याध्यकक्षाला जातीवाचक शिवीगाळ दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती विकास काशिनाथ शिवले, पारोडीच्या महिला सरपंचांचे पती प्रकाश जबाजी शिवले, अनिकेत सुनील शिवले, दिपक भाऊसाहेब येळे, सुरेंद्र संपत शिवले, वैभव नानाभाऊ शिवले, दादा गुलाब शिवले, दत्तात्रय विनायक शिवले यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे सोसायटीची मिटिंग सुरु असताना वाद झाला. यावेळी एकलव्य संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या निशांत पोपट भोसले याला सोसायटीच्या मिटिंग दरम्यान शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती विकास शिवले यांच्यासह काहींनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्य्यांनी मारहाण केली.

याबाबतची माहिती मिळताच एकलव्य संघटनेचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष रवींद्र वाघ सदर ठिकाणी गेले त्यांनी येथील लोकांना निशांतला मारु नका असे म्हटले असता मारहाण करणाऱ्या लोकांनी वाघ यांना शिवीगाळ, दमदाटी करत रस्त्यावर दिसला तरी तुझे हातपाय तोडील अशी धमकी दिली.

त्यावेळी वाघ हे मी पोलिसांत जाऊन तक्रार करतो असे म्हटल्याने सरपंच महिलेचे पती प्रकाश शिवले यांनी माझी बायको सरपंच आहे आमचे कोणी काही करणार नाही तुला काय करायचे ते कर असे म्हणत मारहाण करणाऱ्या सर्वांनी एकलव्य संघटनेचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष रवींद्र वाघ यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केली.

याबाबत एकलव्य संघटनेचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष रवींद्र रामदास वाघ (वय ३४) रा. शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिरूर बाजार समितीचे माजी उपसभापती विकास काशिनाथ शिवले, पारोडीच्या महिला सरपंचांचे पती प्रकाश जबाजी शिवले, अनिकेत सुनील शिवले, दिपक भाऊसाहेब येळे, सुरेंद्र संपत शिवले, वैभव नानाभाऊ शिवले, दादा गुलाब शिवले, दत्तात्रय विनायक शिवले सर्व रा. शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटी सह शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी हे करत आहे.