बँक घोटाळ्या प्रकरणी चोर सोडून सन्याशाला शिक्षा…

क्राईम

जालना: मंठा येथील अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणी नुकतेच 14 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून यातील वादींनी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशाविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे स्थगिती अर्जासह अपिल दाखल केले आहे. याप्रकरणी विभागीय सहनिबंधक यांच्याकडून संबंधित वादी प्रतिवादीसह जिल्हा उपनिबंधक यांना नोटीस बजावून 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

वादी अरुण हरिकिशन होगे, कैलास चव्हाण, नागेश टाले, अरुण आडे यांना जिल्हा उपनिबंधक यांनी 25 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्थाच्या प्राधिकरणाकडे स्थगिती अर्जासह अपील दाखल केले होते. या अपीलानुसार वादी – प्रतिवादी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, अवसायक यांना 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता सुनावणीसाठी मूळ रेकॉर्डसह लेखी किंवा तोंडी म्हणणे दाखल करण्याचे सांगितले आहे. जे खरोखर घोटाळ्यात सहभागी आहेत त्यांना विशेष लेखापरीक्षक सेवादास कांबळे यांनी घोटाळ्यात जबाबदार नसलेल्या कर्मचाऱ्यांना गोवल्याची चर्चा शहरात सुरु आहे.