शिरुर तालुक्यातील साखर कारखान्यात चोरी…

क्राईम

सविंदणे (अरुणकुमार मोटे): रावडेवाडी (ता. शिरुर) येथील पराग साखर कारखान्यातील कारखान्याचे तसेच आतील वीज निर्मिती प्रकल्पाचे कंपाऊंड तोडून न्युट्रल ग्राउंडीग अर्थिंग साठी असलेल्या कॉपर पट्ट्यांची चोरी झाली आहे. पराग कारखाना येथे विज निर्माती प्रकल्प सन २०१८ पासुन चालु आहे. त्याकरीता कोजन ट्रान्सफॉर्मर (स्विच यार्ड) बसविलेला आहे.

सदर ट्रान्सफॉर्मर ची अर्थिंग पास होण्यासाठी कॉपर पट्ट्या बसवलेल्या होत्या. मंगळवार (दि. १३) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पराग कारखान्याचे सुरक्षा अधिकारी रत्नकांत कुरवडे व लेबर ऑफीसर किशोर नेवसे राउंड मारत असातंना विज निर्माती प्रकल्पाचे व कारखान्याचे बाजुने असलेले तार कम्पाउंड कट झालेले दिसले, म्हणुन त्यांनी विदयुत अभियंता गोरक्षनाथ खतोडे यांना कळविले, त्यांनी पाहणी केल्यानंतर विज निर्मीती प्रकल्पाचे कोजन ट्रान्सफॉर्मर (स्विच यार्ड) चेक केला असता ट्रान्सफॉर्मर ते आरपिटचे दरम्यान न्युट्रल पॉईट अर्थ करण्यासाठी बसवलेल्या न्यूट्रल ग्राउंडीग कॉपरच्या 2 पट्ट्या दिसुन आल्या नाहीत, त्या कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. इतर वेळी पोलिसांनाही अडवणारे सुरक्षा रक्षक तिथे तैनात असताना त्यांच्या नजरेतून ही चोरी सुटली कशी? तसेच सगळीकडे CCTV कॅमेरे असताना नेमका त्याच भागात कॅमेरा का नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

बेट भागातील चोऱ्यांचे सत्र वाढल्याने तसेच वळसे पाटील यांच्याच कारखान्यात चोरी होतेय हे खुप धक्कादायक आहे. त्यामुळे या भागात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.