Crime

शिक्रापूरात खिडकीतून घरात प्रवेश करत चोरी

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजे नगर येथील महिला घरात झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने खिडकीतून घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत महिलेच्या पर्स मधील पैसे घेऊन पोबारा केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर येथील मीरा विभूते हि महिला घरात झोपलेली असताना रात्री २ वाजण्याच्या सुमारास एका युवकाने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडत महिलेच्या घरात प्रवेश केला. यावेळी महिलेने पर्समध्ये ठेवलेले सात हजार रुपये सदर व्यक्तीने काढून घेतले. यावेळी महिला जागी होताच सदर व्यक्ती पळून गेला.

घडलेल्या प्रकाराबाबत मीरा बालाजी विभूते (वय ३८) रा. करंजेनगर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. निगमपल्ली हैद्राबाद राज्य तेलंगना यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.