संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

शिरूर तालुका

शिक्रापुरात दोनशे चौदा राक्तदात्यानांचे रक्तदान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असताना संत निरंकारी मिशनच्या तब्बल २१४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी संस्थेचे भोसरी संयोजक अंगद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, त्रिनयन कळमकर, जयराम सावंत यांसह आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सदर निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते,

या मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७३२० रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,११,३४० युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. तसेच बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी मानवतेला दिलेला संदेश रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे हा संदेश संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात असल्याचे संत निरंकारी संस्थेचे भोसरी संयोजक अंगद जाधव यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत शिक्रापूर विभाग प्रमुख जयराम सावंत यांनी आभार मानले.