Shirur Police Station

शिरुर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा

क्राईम

शिक्रापूर: डोंगरगण (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीचा त्याच्या मित्राबरोबर पैशाचा व्यवहार होता. मात्र समोरील व्यक्तीकडून पैसे येण्यास वेळ लागत असल्याने त्यांच्यात वाद झालेला असता तिसऱ्या व्यक्तीने मध्यस्थी केली असता मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला फोन करुन खुनाची धमकी देत तब्बल २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे शिवाजी कृष्णा शेंडगे या व्यक्तीवर खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

डोंगरगण (ता. शिरुर) येथील शिवाजी शेंडगे व रवींद्र दोरगे यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार झालेला असताना दोरगे यांच्याकडून शेंडगे यांना वेळेवर पैसे न आल्याने त्यांच्यात वाद झाला. दरम्यान नितीन थोरात यांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला होता. त्यानंतर शिवाजी शेंडगे याने थोरात यांना फोन करुन शिवीगाळ, दमदाटी करत तू मध्यस्ती केली तर आता तुच मला २ लाख रुपये आणून दे नाहीतर तुझा मनकाच मोडतो, तुला जिवंत मारतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत नितीन अर्जुन थोरात (वय ४७) रा. आमदाबाद (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी शिवाजी कृष्णा शेडगे रा. डोंगरगण (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध शिवीगाळ, दमदाटी सह खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहे.