manchar-cow

चोरीस गेलेली गाई मूळ मालकाला परत…

क्राईम

मंचर, (कैलास गायकवाड): वडगावपीर (ता.आंबेगाव जि. पुणे) येथून काही दिवसापूर्वी चोरीस केलेल्या जर्सी गाईचा व चोरांचा पारगाव (कारखाना) पोलिसांनी शोध घेऊन मूळ मालकास गाय परत केली. गाय परत मिळाल्यामुळे कुटुंबियांना आनंद झाला आहे.

शालन शिवाजी साकोरे (रा. वडगावपीर ता. आंबेगाव) यांनी त्यांची गाई (वय तीन वर्ष) चोरी झाल्याचीफिर्याद दिली होती. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी संतोष कचरू राजगुडे (रा. वडगाव पीर ता. आंबेगाव जि. पुणे) व सचिन कैलास आदक (रा वडगावपीर ता. आंबेगाव जि.पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर विभाग रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे उपनिरीक्षक बीएस लोकरे, पोलिस हवालदार दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, देवानंद किरवे, सचिन डामसे, संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे यांनी केली.

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ…

शिरुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; मात्र अधिकारी म्हणतात…

शिरुर; शरद सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई…

अष्टविनायक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा मृत्यू…

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीमुळे सात तासात ‘जॉन्सन’ सापडला; शिंदे कुटुंबियांनी मानले आभार