शिरुर (तेजस फडके) शिरुर रामलिंग येथील जाधव मळ्यात सलोनी रोहित शेळके या 38 वर्षीय महिलेने राहत्या घरातील फॅनला फाशी घेवून आत्महत्या केली असुन याबाबत तिची आई गितांजली युवराज आयरेकर (वय 38) रा.भोईराज सोसायटी, प्लॉट नं 23 अ, जाधववाडी, मार्केट यार्डसमोर ता.करवीर जि.कोल्हापुर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याने मयत महिलेचा पती रोहित आण्णासाहेब शेळके व आरती उमेश कारखीले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 4 जुलै 2023 ते दि 12 जानेवारी 2024 दरम्यान सलोनी हिला लग्नानंतर तिचे पती रोहित शेळके व त्याच्या आत्याची सुन आरती उमेश कारखीले यांनी वेळोवेळी त्रास देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे सलोनी हिने दि 13 जानेवारी 2024 रोजी रात्री 10:30 च्या दरम्यान राहत्या घरातील फॅनला फाशी घेवून आत्महत्या केली आहे. याबाबत तिची आई गितांजली आयरेकर यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असुन पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले पुढील तपास करत आहेत.
आत्महत्या करण्यापुर्वी लिहिली सुसाईड नोट…
रामलिंग येथील जाधव मळ्यात सलोनी शेळके या महिलेने दि 13 जानेवारी 2024 रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी या महिलेने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असुन त्या सुसाईड नोटच्या आधारे शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले पुढील तपास करत आहेत.
‘त्या’ प्रकरणाची आठवण पुन्हा ताजी…
रामलिंग येथे आठ महिन्यापुर्वी एका महिलेने प्रेमप्रकरणातून सहा पानी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली होती. त्या सहा पानी सुसाईड नोट मध्ये रांजणगाव MIDC मधील एका बांधकाम व्यावसायिकाचे नाव होते. परंतु संबंधित महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पुढे न आल्याने या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे “सौ चुहे खाके बिल्ली चली हज” या म्हणीप्रमाणे तो बांधकाम व्यावसायिक आज उजळ माथ्याने समाजात फिरत आहे. परंतु आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा रामलिंग येथे एका महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याने पुन्हा ‘त्या’ प्रकरणाची शिरुरकरांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.