crime

सणसवाडीत कंपनी कामगारांकडून मालाचा अपहार

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील रोव्हेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनीच कंपनीच्या स्टोअर रुम मधील मालाचा अपहार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर प्रल्हाद पवार व विनोद दत्तात्रय धुमाळ या दोघा कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील रोव्हेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुम मधील सर्व मालांची देखभाल व नोंद ठेवण्यासाठी कंपनीने ज्ञानेश्वर पवार व विनोद धुमाळ या दोघांना नेमलेले आहे. ३ जानेवारी २०२३ रोजी कंपनीतील कामगार स्टोअर रुम मधील काही माल आणण्यासाठी गेले असता त्यांना स्टोअर रुम मधील माल दिसला नाही आणि मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी ही बाब कंपनीचे असिस्टंट मॅनेजर मोहन लोळे यांना सांगितल्याने त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने स्टोअर रुम मधील सर्व मालांची पाहणी केली असता कंपनीतील ज्ञानेश्वर पवार व विनोद धुमाळ या दोघांनी माझी कंपनीतील तब्बल 2 लाख 14 हजार रुपयांच्या मालाचा अपहार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत कंपनीचे असिस्टंट मॅनेजर मोहन ज्ञानदेव लोळे (वय ३८) रा. हडपसर पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानेश्वर प्रल्हाद पवार रा. समर्थ विहार काळूबाई नगर वाघोली ता. हवेली जि. पुणे व विनोद दत्तात्रय धुमाळ रा. गणेश नगर पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार हे करत आहे.