सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील ललिता महादेव काळे या महीलेचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने निघृन वार करुन खून करुन फसार झाला होता. त्याला पकडण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे उभे ठाकले होते. या आरोपीजवळ मोबाईल नसल्याने त्याला शोधण्यास अडचण येत होती.
परंतू टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी तपासाची सुत्रे हातात घेत खबऱ्यांच्या मदतीने फरार आरोपीला करमाळा जि. सोलापूर येथुन मोठया शिताफीने ताब्यात घेतले आहे. गुन्हे घडणे हे कोणाच्या हातात नसते.परंतू या गुन्हातील खरे आरोपी गजाआड होणे महत्वाचे असते.
बेट भागात वर्षभरात खुण, चोऱ्या असे अनेक गंभीर प्रकार घडले असताना प्रत्येक गुन्हयातील फरार व कुठलाही मागमुस नसतानाही आरोपी गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना यश आल्याने शिरुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, दिपक पवार, विशाल पालवे, अनिल आगलावे यांच्या पथकाने केली आहे.