जैन मंदिरातील सोन्याच्या मूर्तीची चोरी; 24 तासात लावला छडा…

क्राईम

औरंगाबाद: कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरातून एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे सोन्याच्या मूर्तीची चोरी करुन त्याजागी त्यासारखीच दिसणारी पितळाची मूर्ती ठेवण्यात आली होती. पोलिसांनी आता या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. दोनच दिवसात पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे. संभाजीनगरच्या कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ या जैन मंदिरात हा सर्व प्रकार घडला होता.

मंदिरात 1 कोटी किमतीची सोन्याची मूर्ती महिन्याभरापूर्वीच बसवण्यात आली होती. सोन्याच्या मूर्तीची चोरी केल्यानंतर त्याजागी हुबेहूब पितळेची मूर्ती ठेवण्यात आली होती. मात्र शनिवारी मूर्तीचा सोन्याचा मुलामा आणि रंग उतरायला लागल्यावर हा सगळा प्रकार लक्षात आला. यानंतर जैन धर्मियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.