शेपूची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आरोग्य

पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. म्हणून त्या खाव्यात असे कितीही सांगितले तरी पालेभाज्यांमध्ये असलेली शेपूची भाजी मात्र अनेकजण खायला बघत नाही. कारण ती खाल्यानंतर सतत करपट ढेकर येत राहतात. पण केवळ वासामुळे जर तुम्ही भाजी खात नसाल तर तुम्हाला कदाचित या भाजीचे फायदे माहीत नाहीत.

अगदी थोडीशी शेपूची भाजी जरी तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. (शेपूच्या भाजीला ‘डील’ असे देखील म्हणतात) शेपूची भाजी बाजारात सहज उपलब्ध असते. त्याची पान अगदीच पातळ असतात. बाराही महिने ही भाजी उपलब्ध असते. बाजारात शेपूची भाजी मिळणार नाही असे अजिबात होत नाही. अगदी लहानशी जुडीही एका दिवसासाठी पुरेशी असते. मुगाची डाळ घालून शेपूची भाजी केली जाते. भाकरी किंवा पोळीसोबत ही भाजी खाल्ली जाते. आज आपण शेपूची भाजी खाण्याचे फायदे पाहू.

शेपूच्या भाजी फायदे जाणून घेण्याआधी भाजीमधील पोषकत्वे जाणून घ्या म्हणजे तुमच्या शरीराला नेमकी कोणती पोषकत्वे मिळतात हे देखील तुम्हाला यातून कळू शकेल.

व्हिटॅमिन C : 141%

लोह : 36%

व्हिटॅमिन B6 : 10%

कॅल्शिअम : 20 %

मॅग्नेशिअम : 13 %

पोटॅशिअम : 21 %

कोलेस्ट्रॉल : 0 %

डाएटरी फायबर : 2.1 ग्रॅम

प्रोटीन : 3.5 ग्रॅम

कॅलरीज : 43

कार्बोहायड्रेट : 7 ग्रॅम

शेपूच्या भाजीचे फायदे

पोटाचे विकार करते दूर: खूप जणांना पोटाचे विकार असतात. विशेषत: पोट होण्याची समस्या खूप जणांना असतात. जर तुम्हाला पोटासंदर्भात काही विकार असेल तर तुम्ही शेपूची भाजी खायला हवी. पोटाचे विकार यामध्ये पोट साफ होणे, पोट दुखणे, पोट फुगणे असे त्रास असतील तर तुम्ही आहारात शेपूच्या भाजीचा समावेश व्हायला हवा.

वजन नियंत्रणात ठेवण्यास करते मदत: बद्धकोष्ठेतेचा त्रास असेल तर अशा लोकांचे वजन कारण नसताना वाढते. खूप वेळा वजन वाढण्याचे कारण पोट साफ न होणे हे असते. जर तुमचे पोट खराब असेल आणि या कारणामुळे तुमचे वजन वाढत असेल तर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही शेपूची भाजी आहारात समाविष्ट करायला हवी. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

निद्रानाशाचा त्रास करते कमी: हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना निद्रानाशचा त्रास असतो. तुम्हालाही रात्री झोप लागत नसेल तर तुम्ही शेपूची भाजी हमखास खायला हवी. शेपूमध्ये फ्लेवोनाईड्स आणि व्हिटॅमिन B हे घटक असतात जे तुमचे मन आणि मेंदू शांत ठेवण्याचे काम करतात. जर तुमचे मन आणि मेंदू शांत असेल तर तुम्हाला झोपही चांगली लागते. शेपूची भाजी रोज जेवणात अगदी थोडीशी जरी शेपूची भाजी असेल तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा मिळण्यात मदत मिळेल.

हार्मोन्सचे संतुलन राखण्यास करते मदत: हार्मोन्सचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत असतो. हार्मोन्स कमी जास्त झाले की, त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो. जर तुम्हाला अनियमित मासिक पाळीचा त्रास असेल किंवा तुम्हाला मासिक पाळी येणार असेल तर तुमच्या आहारात शेपूची भाजी असायला हवी. कारण शेपूमध्ये असलेल्या पोषकतत्वांमुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.

मासिक पाळीतील त्रास करते कमी: मासिक पाळीशी निगडीत त्रास तुम्हाला असेल तर तुमच्यासाठी शेपूची भाजी ही तुमच्यासाठी फारच चांगली आहे. अनेकदा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळीत पोट दुखणे, रक्तस्राव अनियमित असणे असे काही त्रास होऊ लागतात. त्यामुळे मासिक पाळीतला हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शेपूच्या भाजीचा आहारात समावेश करायला हवा. शेपूची भाजी खाण्याचे फायदेमध्ये महिलांसाठी हा अत्यंत महत्वाचा असा फायदा आहे.

हाडांना आणते बळकटी: हाडांना बळकटी देण्यासाठी फारच फायद्याची असते. कॅल्शिअमचा घटक असल्यामुळे शेपूची भाजी ही फारच फायद्याची ठरते. जर तुम्हाला सांधेदुखी असेल तर तुम्ही आहारात शेपूची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट करायला हवी. हाडांना बळकटी आणण्यासाठी तुम्ही नक्कीच शेपूची भाजी खायला हवी.

मधुमेहींसाठी चांगली: मधुमेही व्यक्तिंना काही भाज्या खाण्याची परवानगी नसते. एखादी भाजी खाताना त्यातली साखर बघून त्यांना ती खावी लागते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही शेपूच्या भाजीचे सेवन तुम्ही करायला हवे.

पचनशक्ती करते चांगली: पालेभाज्या या पचनशक्ती चांगली करण्यासाठी फायद्याचे असतात. त्यामुळे पालेभाज्या खाण्यास सांगितले जाते. शेपूची भाजी ही अगदी त्याच पद्धतीने फायद्याचे आहे. पचनशक्ती चांगली करण्यासाठी शेपूची भाजी खायला हवी. शेपूची भाजी खाल्यामुळे अगदी काहीच दिवसात तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. शेपूची भाजी खाल्ल्यानंतर आलेले ढेकर खूप जणांना आवडत नाही. पण त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.

ह्रदय आरोग्यासाठी चांगले: ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणे गरजेचे असते. हल्ली अनेकांना सर्रास होणारा त्रास म्हणजे कोलेस्ट्रालचा. जर तुम्हालाही कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्ही शेपू खायलाच हवा. शेपूच्या भाजीमुळे वाईट कोलेस्ट्राल शरीरातून कमी होते आणि शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिले तर तुमचे हृदयाचे कार्य सुरळीत चालते.

(सोशल मीडियावरुन साभार)