शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर शहरातून दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हिसकावल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे 2 अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिरुर शहरातील बागवाननगर रस्त्याने अशोक हांगे व ज्योती हांगे हे दांपत्य त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एस टी ५९५० या दुचाकीहून चाललेले असताना पाठीमागून एका दुचाकीवरुन दोन अनोळखी युवक आले त्यातील पाठीमागे बसलेल्या युवकाने ज्योती यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून काढले आणि दोघे युवक दुचाकीवरुन पळून गेले.
याबाबत अशोक तुळशीराम हांगे (वय ४०) रा. श्रीराम कॉम्प्लेक्स बागवान नगर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी 2 अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.