शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीहून आलेल्या दोघा अज्ञात युवकांनी हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात दोन युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन रेखा मचाले व दादासाहेब मचाले हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ ई ई ०१५६ या दुचाकीहून चाललेले असताना कोंढापुरी येथील कवठीमळा येथे आल्यानंतर पाठीमागून दोन अनोळखी युवक दुचाकीहून आले. दरम्यान पाठीमागे बसलेल्या युवकाने रेखा यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला.

याबाबत रेखा दादासाहेब मचाले (वय ३६) रा. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.