स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये हडपसर वॉरियर्स संघ विजेता

शिरूर तालुका

भारतीय महिला संघाच्या अनुजा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे नगर महामार्गावर कार्यकर्त असलेल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून क्रिकेट स्पर्धेत हडपसर वॉरियर्स संघ विजेता ठरला आहे.

पुणे नगर महामार्गावर कार्यकर्त असलेल्या स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत राज्यभरातून डॉक्टरांच्या 20 टीम व 300 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. 7 दिवस आयोजित या स्पर्धेत प्रथम क्रमांक हडपसर वॉरियर्स, द्वितीय क्रमांक किंग्स ११ बारामती, तृतीय क्रमांक कारेगाव- रांजणगाव – ढोक सांगवी डॉक्टर्स असोसिशन, चतुर्थ क्रमांक बारामती सुपर किंग्स यांनी पटकाविला आहे तर उत्कृष्ट फलंदाज व मॅन ऑफ दि मॅच डॉ. अविनाश गावडे, उत्कृष्ट गोलंदाज डॉ. मिलिंद गाढवे तर अंतिम सामान्यात मॅन ऑफ दि मॅच डॉ. प्रवीण मोरे यांना मिळाला आहे.

सदर क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी डॉ. श्रीकांत साकोरे यांनी विशेष पुढाकाराने स्पंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे, सचिव डॉ. अनंता परदेशी, उपाध्यक्ष डॉ. रामदास देवखिळे, खजिनदार गणेश भोसले, प्रीतम दरवडे, मिथिलेश खाजेकर, क्रीडा सचिव डॉ. नितीन शिंगाडे यांच्या अथक प्रयत्नातूनसंपन्न झाल्या आहेत.

याबाबत बोलताना लोक वैद्यकीय व्यावसायिकांना आदर्श मानतात व त्यांचे अनुकरण करतात. आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळाचे महत्व समाजामध्ये अधोरेखित करणे या हेतूने सदर स्पर्धा भरवण्यात आल्या असल्याचे स्पंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.