कोण आहेत द्रौपदी मुर्मू? राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल…

देश

नवी दिल्लीः एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आज (शुक्रवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सोमवारी (ता. २१) भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू
द्रौपर्दीमुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला असून, त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी1997 मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून 1997 त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या.

नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या. राष्ट्रपती झाल्या तर आदिवासी समुदायाला एक मोठं स्थान देशाच्या राजकारणाला मिळेल. तसेच ते नरेंद्र मोदींची प्रतिमेला उजाळा देण्यासाठी उपयुक्त ठरेल. द्रौपदी मुर्मू या भारताच्या पुढील राष्ट्रपती झाल्या तर भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती असतील आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील.

तत्पूर्वी, विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांकडून शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांचे नाव समोर आले होते. मात्र, दोघांनीही त्याला नकार दिला होता.