उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्दे…

राजकीय

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून मार्गदर्शन केलं.

मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं काम केले गेलेल्यांना उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनातील महत्त्वाचे मुद्देः
मी जिद्द सोडली नाही, जिद्द अजून कायम आहे
मला सत्तेचा लोभनाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो आहे
‘मला वाटलं सीएमपदाची खूर्ची हलतेय मात्र ते मानेचं दुखणं होतं’
पंतप्रधानांकडून शस्त्रक्रियेबद्दल विचारणा
कोरोनामुळे डोळ्यात पाणी, ते अश्रू नाहीत
‘मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेऊन बसलेले’
बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप
‘ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा’
माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा
माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा
झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मुळ मात्र नेऊ शकत नाही
‘जे सोडून गेले त्याचं मला वाईट का वाटावं?’
‘आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन?’
‘बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं?’
‘बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचं काम’
एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?, नगरविकास खातं दिलं
माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली
संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी सांभाळलं
आपलीच काही लोकं घेऊन सेनेवर सोडण्यात आली
सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल