Kerala Festival

फोटो निट पाहा आणि कोण आहे सांगा बरं?

देश

तिरुवनंतपुरम (केरळ) : बातमीमधील फोटो नीट पाहा कोण आहे सांगा बरं? लवकर नाही सांगता येणार. पण, कोणतरी महिला असल्याचे सांगू शकाल. पण, साडी नेसलेली, कुरळे केस मोकळे सोडलेली, कानात झुमके, डोक्यावर टिकली, चमकदार चेहरा आणि त्या चेहऱ्यावर गोड हसू. सुंदर अशी ही महिला, जिला पाहताच काही जण तिच्या प्रेमातही पडले असतील. या महिलेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामागे खास कारणही आहे.

फोटोचे सत्य समजल्यानंतर तुम्हालाही यावर विश्वास बसणार नाही. आयआरएएस ऑफिसर अनंत रूपनागुडी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. कोण आहे ही महिला, का आली चर्चेत, काय आहे तिचं सत्य? याबाबत तुम्ही काही अंदाज लावू शकता का? तुम्हाला काही माहिती आहे का? डोक्याला थोडा जोर लावून बघा, तुम्हाला जमतंय का?

रूपनागुडी यांनी ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील एका उत्सवातील हा फोटो आहे. कोल्लम जिल्ह्यातील कोट्टमकुलकारा परिसरातील देवीचं एक मंदिर आहे. जिथं मयाविलक्कू उत्सव असतो. मल्याळम महिना मीनमच्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी म्हणजे मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात हा उत्सव असतो. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यात पुरुष महिला बनतात. म्हणजे पुरुष महिलांसारखे तयार होतात आणि या उत्सवात सहभाही होतात. पुरुष महिलांसारखे दागिने-ड्रेस घालून, मेकअप करून नटूनथटून मशाल, दिवे घेऊन येतात. या फोटोत दिसणारी महिलाही महिला नाही तर पुरुष आहे, जी या उत्सवात सहभागी झाला. या उत्सवात त्याला पहिला पुरस्कार मिळाला. हा त्याच दिवसाचा फोटो आहे.

1 thought on “फोटो निट पाहा आणि कोण आहे सांगा बरं?

  1. तुमच्या या बातमीने पाकिस्तान घाबरला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सुखावला आहे. शेतमालाला बाजार भाव वाढले आहेत. अशाच बातम्या टाकत रहा.

Comments are closed.